घरठाणेरांगेपासून सुटका! दिवा स्थानकात अतिरिक्त आठ नवीन एटीव्हीएम मशिन्स दाखल

रांगेपासून सुटका! दिवा स्थानकात अतिरिक्त आठ नवीन एटीव्हीएम मशिन्स दाखल

Subscribe

कल्याण लोकसभा मतदार संघाचे स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या मागणीनुसार व दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे दिवा स्थानकात तब्बल आठ नवीन अतिरिक्त ए.टी.व्ही.एम. मशिन्स बसविल्या जाणार आहेत.

ठाणे – दिवा स्थानकातून अप आणि डाऊन दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. परिणामी तिकिट खिडक्यांवर रांगाच रांगा लागलेल्या दिसतात. मात्र, आता या रांगा कमी होणार आहेत. कारण, दिवा स्थानकात तब्बल आठ नवीन अतिरिक्त ए.टी.व्ही.एम. मशिन्स दाखल झाल्या आहेत. या मशिन्स प्रत्येक पादचारी पुलावर दोन अशा पद्धतीने बसविल्या असून शिल्लक दोन मशिन्स तिकीट घरामध्ये ठेवण्यात आले आहेत. येत्या एक दोन दिवसात या मशिन्स प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध होतील, अशी माहिती दिवा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आदेश भगत यांनी दिली. (Eight more ATVM machines at diva station)

हेही वाचा ठाण्यात मानाची हंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांना अडीच लाखांचे पारितोषिक

- Advertisement -

दिवा पूर्वेला एकही तिकिट खिडकी नाही. त्यामुळे प्रवाशांना पुलावरील ए.टी.व्ही.एम. मशीन किंवा मुख्य तिकिट खिडकीवर जाऊन तिकिट काढावे लागते. परिणामी प्रवशांच्या वेळेचा अपव्यय होतो. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या मागणीनुसार व दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे दिवा स्थानकात तब्बल आठ नवीन अतिरिक्त ए.टी.व्ही.एम. मशिन्स उपलब्ध झाल्या आहेत. या मशिन्स प्रत्येक पादचारी पुलावर दोन अशा पद्धतीने ठेवल्या असून, शिल्लक दोन मशिन्स या तिकीट घरामध्ये उपलब्ध आहेत.

या मशिन्सवरून तिथे उपस्थित असलेल्या फॅसिलेटरतर्फे तिकीट दिली जाणार आहेच. तसेच, ऑनलाईन पद्धतीनेही प्रवाशांना तिकीट काढता येणार असल्याचे मध्य रेल्वेने सूचित केले आहे. सध्याच्या स्थितीला मध्यभागी असणाऱ्या पादचारी पुलावर एकही ए.टी.व्ही.एम. मशीन नसल्यामुळे मुंब्रादेवी कॉलनी परिसरातील प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी विशेष त्रास सहन करावा लागत होता. आता या पादचारी पुलावर दोन नवीन ए.टी.व्ही.एम मशिन्स येत असल्याने येथील प्रवाशांचा त्रास वाचणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – दिव्यात रिक्षाचालकांकडून मनमानी कारभार, जवळचे भाडे नाकारत असल्याने प्रवासी त्रस्त

दिवा पूर्वेतील रहिवाशांना दिलासा

दिवा शहराची ९० टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या पूर्वेला असून, एकमेव तिकीट घर पश्चिमेला आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीटघरातून तिकीट काढण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडावे लागत होते, अन्यथा पादचारी पूल दोनदा चढावा-उतरावा लागत होता. या गोष्टीची दखल घेत स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मागणी करून दिवा पूर्वेला देखील नवीन तिकीटघराची मागणी रेल्वेमंत्र्यांकडे केली होती आणि त्यामुळेच आज दिवा शहराच्या पूर्वेला कल्याण दिशेकडे नवीन तिकीट घराचे काम जलद गतीने सुरू असून ते लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -