घरठाणेस्वघोषित हभप बुवाकडून वृद्ध महिलेस जबर मारहाण

स्वघोषित हभप बुवाकडून वृद्ध महिलेस जबर मारहाण

Subscribe

ढोंगी बुवा ने त्यांच्याच घरातील एका वयोवृद्ध महिलेस लाथाबुक्क्यांनी तसेच प्लास्टिकच्या बादलीने अमानुष मारहाण केल्याचा विडिओ सध्या सोशलमिडीयावर तूफान व्हायरल होत आहे

‘लोका सांगे ब्रम्हज्ञान, मात्र स्वत कोरडे पाषाण, अशी मराठीत म्हण आहे याचा प्रत्यक्ष अनुभव कल्याण तालुक्यातील मंलगपट्यातील व्दारली या गावात आला. स्वतःला हभप महाराज म्हणवणाऱ्या या ढोंगी बुवा ने त्यांच्याच घरातील एका वयोवृद्ध महिलेस लाथाबुक्क्यांनी तसेच प्लास्टिकच्या बादलीने अमानुष मारहाण केल्याचा विडिओ सध्या सोशलमिडीयावर तूफान व्हायरल होत आहे. त्यानंतर हा बुवा असे कृत्य करुन पोलीस यायच्या आधीच आळंदीला पसार झाला आहे. साधुसंतांच्या महाराष्ट्रात काही महाभाग पवित्र अशा तुळशीच्या माळेचे महत्त्व विसरले आहेत. माळ घालून अशी बोगस मंडळी चुकीचे वागत आहेत. कल्याण तालुक्यातील मलंग पट्ट्यातील व्दारली या गावात राहणारा गजानन चिकनकर हा इसम स्वतः ला हभप महाराज समजतो.

 

- Advertisement -

याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे. गाव आणि परिसरात भजन किर्तन असले की हा बुवा तेथे भक्तांना ज्ञानाच्या गोष्टी सांगतात. पण हाच बुवा एका वयोवृद्ध महिलेस लाथाबुक्क्यांनी प्लास्टिकच्या बादलीने अमानुष मारहाण करतानाचा विडिओ सोशलमिडीयावर व्हायरल झाला. या विडिओची सत्यता पडताळणीसाठी गावातून माहिती घेतली बुवाची पोलखोल झाली. गजानन चिकनकर हा पकवाज वाजवतो आणि किर्तन करतो. पहिल्या बायकोचे वय जास्त झाल्याने तिला घरातील कामे होत नाहीत. त्यामुळे तो तिला अमानुष मारहाण करत असे, घरातील सुना, नातवंडे, यांना देखील शिवीगाळ मारहाण करत होता.

 

- Advertisement -

हे रोजचेच झाल्याने शेजारी देखील वैतागून गेले होते. हा मारहाणीचा विडिओ त्याच्या नातवाने शूट करून व्हायरल केला आहे. यामध्ये अगदी लाथाबुक्क्यानी प्लास्टिकची बादलीने अमानुष मारहाण करताना दिसत आहे. हे करताना आपल्या गळ्यात तुळशीची माळ आहे हे देखील तो बुवा विसरला आहे. हा विडिओ व्हायरल होताच पोलीस यांच्या घरी गेले होते. मात्र या बहाद्दराने केलेले पाप धुण्यासाठी केव्हाच आळंदी गाठली असल्याचे समजले.

काही प्रकार उघडकीस आला किंवा तक्रार झाली तर मी माळकरी आहे, असे करु शकत नाही, असा कांगावा करून पवित्र अशा माळेची शपथही घ्यायला हे भोंदू कचरत नाही. अशा ढोंगी बुवाच्या विरोधात समाजाने पोलिसांकडे तक्रार करायला हवी असे मत कल्याण पंचायत समितीचे उपसभापती किरण ठोंबरे यांनी व्यक्त केली. तर अशा चालबाज बुवांवर वारकऱ्यांनीच बहिष्कार घालावा व तुळशीच्या माळेचे पावित्र्य टिटवावे असे मत एक वारकरी वाळकू भोईर यांनी व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -