घरठाणेठाणे जिल्हा वकील संघटनेची निवडणूक ५ मार्चला ; ११ जागांसाठी २३ जण...

ठाणे जिल्हा वकील संघटनेची निवडणूक ५ मार्चला ; ११ जागांसाठी २३ जण रिंगणात

Subscribe

ठाणे जिल्हा वकील संघटना पदाधिकारी निवडणुकीत अध्यक्षांसह ते सदस्यपद या २३  जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

ठाणे: दर २ वर्षांनी होणारी ठाणे जिल्हा वकील संघटना पदाधिकारी निवडणुक कोरोनामुळे लांबणीवर पडली होती. मात्र आता ही निवडणुक येत्या 5 मार्च 2022 रोजी होणार अशी घोषणा होताच उमेदवारांनी प्रचार प्रक्रिया सुरू केली आहे. ठाणे जिल्हा वकील संघटना पदाधिकारी निवडणुकीत अध्यक्षांसह ते सदस्यपद या 23 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

निवडणुक ही निवडणुक 5 मार्च 2022 या एकाच दिवशी पार पडणार आहे. निवडणुकीत एकूण 1350 वकील मतदार आहेत. या निवडणूकीसाठीचे मतदान बार रूम कोर्ट नाका ठाणे येथे शनिवार 5 मार्च 2022 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत होईल तर त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी, निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

- Advertisement -

ठाणे जिल्हा वकील संघटना पदाधिकारी निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून अध्यक्ष पदासाठी प्रशांत गणपत कदम, मधुकर आत्माराम पाटील यांनी उमेदवारी जागी दाखल केलं आहे. तर  उपाध्यक्ष पदासाठी हेमलता अविनाश देशमुख, सुधाकर भाऊलाल पवार,  सुभाषचंद्र नागेश्वर सिंह, सचिव पदासाठी नरेंद्र चंद्रकांत गुप्ते , भाऊ जंकू हाडवले, सुनिल एकनाथ लसने, खजिनदार पदासाठी अनिल दामोदर जोशी,विजय वाजगे आणि सहसचिव पदासाठी शांताराम भास्करराव देवरे, हेमंत दिगंबर म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

जॉइंट सेक्रेटरी लेडीज पदासाठी स्नेहल गणेश कासार, रुपाली विठोबा म्हात्रे. समिती सदस्य पद सरीता नामदेव बंद्रे, विकास शंकर जोशी, संतोष कुमार पांडे, अनिल लक्ष्मण पवार , गणेश अप्पाजी पुजारी , उपेक्षा पंडित शेजवाल, रुपाली रोहित शिंदे, राजाराम शंकर तारमळे, सायली वलामे  हे  २३ उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत. तर निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. मुनीर अहमद हे काम पाहणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून दिली.


स्थायी समितीतील ६५० कोटींचा फेरफार आयुक्तांकडून रद्द -: भाजपाचा दावा


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -