घरक्राइमवारणा नदीत आढळला अपहरण झालेल्या 'त्या' शासकीय कंत्राटदाराचा मृतदेह

वारणा नदीत आढळला अपहरण झालेल्या ‘त्या’ शासकीय कंत्राटदाराचा मृतदेह

Subscribe

पोलिसांना तपासात माणिकराव यांची कार जयसिंगपूरजवळ सीसीटीव्ह फूटेजमध्ये दिसून आली. यानंतर कोंडीग्रेजवळ त्यांची कार बेवारस अवस्थेत दिसली

सांगली  : सांगली जिल्ह्यातील अपहरण झालेल्या शासकीय कंत्राटदार माणिकराव पाटील यांचा मृतदहे अखेर सापडला आहे. हात बांधलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह कवठेपिरान हद्दीतील वारण नदी पात्रात टाकून देण्यात आला होता. त्यामुळे अपहरण करून मग त्यांची हत्या झाल्याचे तपास स्पष्ट झाले आहे. मात्र खून करण्यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

माणिकराव पाटील यांच्या अपहरणाची तक्रार त्यांचा मुलगा विक्रमसिंह यांनी सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. 13 ऑगस्ट रोजी त्यांचे तुंग येथून अपहरण करण्यात आले. पाटील त्यांच्या कारमधून तुंग येथे गेले होते, त्याच कारमधून त्यांचे अपहरण करण्यात आले. रात्री 8.30 ते 9.45 सुमारास ही अपहरणाची घटना घडली. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी अनेक तास त्यांचा शोध घेतला, नातेवाईक, मित्रमंडळींना संपर्क केला मात्र ते कुठेच आढळून आले नाहीत.

- Advertisement -

त्यामुळे पाटील यांचा मुलगा विक्रमसिंह पाटील यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावेळी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका ठिकाणाहून ते आपल्या कारने जाताना दिसले. मात्र पोलिसांनी अधिक खोलात जाऊन तपास केला. पोलिसांनी कुटुंबियांना माणिकराव पाटील यांचे कोणाशी वाद होते का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले, मात्र त्यांना इतर अडचणी नसल्याने त्यांचे अपहरण कोण आणि कशासाठी करेल याचा अंदाज कुटुंबियांना देखील नव्हता.

पोलिसांना तपासात माणिकराव यांची कार जयसिंगपूरजवळ सीसीटीव्ह फूटेजमध्ये दिसून आली. यानंतर कोंडीग्रेजवळ त्यांची कार बेवारस अवस्थेत दिसली, त्याच आधारे पोलिसांनी शासकीय कंत्राटदार माणिकराव पाटील यांचा शोध घेतला.


ठाण्यात हस्तीदंताच्या विक्रीचा प्रकार ; अडीच कोटींच्या हस्तीदंतासह दुकली गजाआड

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -