घरठाणेनागरिकांच्या करातील 25 टक्के रक्कमही खर्च होत नाही

नागरिकांच्या करातील 25 टक्के रक्कमही खर्च होत नाही

Subscribe

आमदार गणपत गायकवाड यांची माहिती

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात राज्य आणि केंद्र सरकारकडून कोट्यावधीचा विकास निधी आला आहे. जवळपास 80 टक्के निधी केंद्र आणि राज्य सरकारचा आहे. महापालिका नागरीकांकडून कर स्वरुपात पैसा वसूल करते. परंतू यातील 25 टक्के पैसा सुद्धा खर्च केला जात नाही. मग हा पैसा जातो कुठे याचा तपास लागला पाहिजे असे मत कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी व्यक्त केले.

कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्वेतील विविध समस्यांबाबत तत्कालीन आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली होती. या समस्या सोडविण्याचे आश्वासन दांगडे यांनी दिले होते. मात्र दांगडे यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर आयुक्त इंदूराणी जाखड या रुजू झालेल्या आहेत. भाजप आमदार गायकवाड यांनी त्याच समस्यांसंदर्भात आयुक्त जाखड यांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी समस्यांसदर्भात जाखड यांना माहिती दिली.

- Advertisement -

यावेळी भाजप आमदार गायकवाड यांनी सांगितले कल्याण पूर्वेत 100 फूटी रस्त्याचा प्रश्न, इमारतीचा प्रश्न, पाणी समस्या आहे. रस्ते चांगले नाहीत. आरक्षीत मैदानांवर आतिक्रमण झाले आहे. मी या पूर्वी देखील तत्कालीन आयुक्तांना भेटलो होतो. आता नवनिर्वाचित आयुक्तांनाही भेटलो आहे. सर्व आयुक्त आश्वासनेच देतात. रस्ते, पाणी आणि आरक्षीत मैदानावरील अतिक्रमण हे अनेक प्रश्न आहेत. केडीएमसीत 80 टक्के निधी राज्य आणि केंद्र सरकारकडून आला आहे. तर मग महापालिकेचा पैसा जातो कुठे हे तपासण्याची गरज आहे. नागरीकांकडून विविध करांच्या स्वरुपात महापालिका वसूली करते. त्यापैकी 25 टक्के सुद्धा खर्च होत नाही असा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -