घरठाणेतज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा एक मार्चपासून उपलब्ध

तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा एक मार्चपासून उपलब्ध

Subscribe

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आवाहनाला अनुकूल प्रतिसाद

इंडियन मेडिकल असोसिएशनने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आवाहनाला अनुकूल प्रतिसाद देवून महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालय आणि शास्‍त्रीनगर रुग्णालय या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा सर्वसामान्य गरजू रूग्णांसाठी दिनांक 1 मार्च 2021पासून उपलब्ध करून देण्यास सहकार्य केले आहे.

कोविडच्या भीषण संकटात महापालिकेकडे अपुरी वैद्यकिय सेवा उपलब्ध असताना इंडियन मेडिकल असोसिएशन तसेच कॅम्पा, निमा आणि इतर वैद्यकीय संघटनांनी कोविड संकटाचा सामना करण्यासाठी डॉक्टर्स आर्मी तयार करून अभूतपूर्व काम करीत कोरोनाची लढाई लढली. त्यामुळे रुग्ण संख्येचा चढता आलेख कमी झाला.

- Advertisement -

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे बाई रूक्मिणीबाई रूग्णालय, शास्त्रीनगर रूग्णालय येथे खासगी डॉक्टरांच्या पॅनलच्या माध्यमातून 1 मार्च 2021 पासून ओपीडी बाह्यरुग्ण विभागात दुपारी 2.00 ते 5.00 या वेळेत रुग्णांसाठी तपासणी सुविधा उपलब्ध होणार आहे. यामध्ये फिजीशियन, नेत्रचिकित्सा, शल्यचिकित्सा, नाक, कान, घसा, दंत चिकित्सा तपासणीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत रुग्णांसाठी तपासणी सेवा पुरविल्या जाणार आहेत. महानगरपालिकेच्या रूग्णालयात आता या सुविधांची उपलब्धता केल्यामुळे सर्वसामान्य गरजू रूग्णांना दिलासा मिळणार आहे.

बाई रुक्मिणीबाई हाॅस्पीटल
फिजीशियनची तज्ज्ञ सेवा बाई रूक्मिणीबाई रुग्णालयात बुधवार आणि गुरुवार उपलब्ध होईल.. नेत्रचिकित्सा तज्ज्ञसेवा सोमवार आणि शुक्रवार, शल्य चिकित्सा बुधवार आणि शनिवारी, नाक,कान,घसा तज्ज्ञसेवा सोमवार, शुक्रवार उपलब्ध असेल. दंत चिकित्सा मंगळवार आणि शुक्रवार,

- Advertisement -

शास्त्रीनगर हाॅस्पीटल
तसेच शास्त्रीनगर रुग्णालयात बाहय रूग्णालय विभागात फिजीशियनची तज्ज्ञ सेवा शुक्रवारी उपलब्ध असेल. नेत्रचिकित्सा मंगळवार आणि गुरुवारी उपलब्ध असेल. नाक,कान,घसा सेवा मंगळवार आणि गुरुवारी उपलब्ध असेल. या सेवांचा लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वैदयकिय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -