घरठाणेकोवीड लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र सातशे रुपयांत

कोवीड लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र सातशे रुपयांत

Subscribe

 खंडणी विरोधी पथकाकडून कारवाई

ठाणे । कोविड लसीकरणाचा प्रत्यक्षात कोणताही डोस न घेता, नागरिकांना अवघ्या ७०० रुपयांमध्ये दोन्ही लसीचे डोस घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करून विकणाऱ्या नालासोपारा, वसईरोड येथील सौरभ बजरंगी सिंग (१९) या तरुणाला ठाणे खंडणी पथकाने जेरबंद केले. तसेच त्याने अनेक जणांना अशाप्रकारे बनावट प्रमाणपत्र बनवून देताना नागरिकांकडून १५ हजार रुपये घेतल्याचे तपासात निष्पान झाले आहेत.

देशात कोव्हीड १९ या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून सरकारने पावले उचलली आहेत. त्यातून जनतेला डोस घेतल्यावर प्रमाणपत्र दिले जात आहे. मात्र लसीकरणाच्या डोस पैकी कोणताही लसीचा डोस प्रत्यक्षात घेतलेला नसताना सौरभ बजरंगी सिंग याने राबोडीतील फजलुर रहेमान शेख याचे  लसीचे २ डोस घेतल्याचे आणि तशा मजकुरचे सरकारकडून दिल्या जाणा-या प्रमाणपत्रासारखे बनावट सर्टीफिकेट बनवले. आणि त्याची विक्री करून शेख यांच्यासह शासनाची फसवणूक केली. याप्रकरणाची फजलुर रेहमान शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ठाणे नगर पोलीस ठाणे गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर सौरभ सिंग याला अटक करण्यात आली. पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक एस.आर. हुबे हे करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -