घरठाणेअति धोकादायक ठरलेल्या पाच मजली इमारतींवर अखेर कारवाई

अति धोकादायक ठरलेल्या पाच मजली इमारतींवर अखेर कारवाई

Subscribe

आपलं महानगर इम्पॅक्ट

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील अतिधोकादायक गणल्या गेलेल्या इमारतींवर पालिका प्रशासनाने अखेर आपलं महानगरच्या १ मे रोजीच्या अंकात ‘अडीचशे ते तीनशे इमारती अतिधोकादायक’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घ्यावी लागली. डोंबिवलीतील 42 वर्षे जुनी अति धोकादायक तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करू पाहणाऱ्या अचलकर कंपाउंड मधील कमल सदन या पाच मजली इमारतींवर निष्कासणाची कारवाई सुरू केली.
डोंबिवली पूर्व येथील इमारत मालक विनायक अचलकर यांच्या तळ अधिक चार मजली इमारत गेल्या 42 वर्षापासून भग्नावस्थेत असतानाही या इमारतीत २० साधनिकेमध्ये नागरिक आपल्या परिवारासह जीव मुठीत धरून राहत होती.

आपलं महानगर ने कल्याण डोंबिवलीतील अशी धोकादायक ठरविल्या गेलेल्या इमारतींचा प्रश्न १ मे च्या अंकात प्रसिद्ध केला होता. या वृत्ताची पालिका प्रशासक डॉक्टर भाऊसाहेब दांगडे यांनी गंभीर दखल घेत अतिधोकादायक ठरल्या गेलेल्या 42 वर्षे जुन्या इमारतींवर कारवाई करीत तिला जमीन दोस्त करण्यात आले. अचलकर कंपाउंड मधील कमल सदन ही इमारत अत्यंत धोकादायक व राहत असणाऱ्या नागरिकांसाठी जीवघेणी ठरली होती. केव्हाही कोसळणाऱ्या या इमारतीवर फ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भरत पाटील, उपअभियंता विसपुते, अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे अधीक्षक जयवंत चौधरी, पालिका, पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने एक पोकळेन,२ ब्रेकर मशीन, १५ मजूर यांच्या सहाय्याने करण्यात आली.

- Advertisement -

कल्याण ,डोंबिवली टिटवाळा आदी परिसरात मोठ्या प्रमाणात अशा अतिधोकादायक ठरल्या गेलेल्या इमारतींचा समावेश असून पावसाळ्यापूर्वी नोटीस दिल्या गेलेल्या अति धोकादायक इमारतींवर कारवाई न झाल्यास इमारती कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान कमल सदन या इमारतीत वास्तव करून राहत असणाऱ्या 20 सदनिका धारक मालक भाडेकरूंना पालिकेने भोगवटा प्रमाणपत्र दिले आहे. १ मे च्या अंकात बातमी प्रसिद्ध केल्याने कल्याण डोंबिवलीत ‘आपलं महानगरचे, विशेष कौतुक केले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -