घरठाणेठाण्यातील रहेजा गार्डन इमारतीमध्ये भीषण आग; १६ जणांना वाचवण्यात यश

ठाण्यातील रहेजा गार्डन इमारतीमध्ये भीषण आग; १६ जणांना वाचवण्यात यश

Subscribe

ठाण्यातील रहेजा गार्डन या गृहसंकुलातील अस्कॉना बिल्डिंग पाच मजल्यावरील बर्वे यांच्या घरात आग लागल्याची घटना मंगळवारी पहाटे ४.४५ च्या सुमारास समोर आली. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरी धूर पसरल्याने धुरात अडकलेल्या १५ ते १६ रहिवाश्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. ही आग एसीमध्ये शॉटसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावेळी घरात आजीबाई एकट्याच होत्या. त्यांच्या ही बाब लक्षात येताच, त्यांनी शेजाऱ्यांना त्याची माहिती दिली.

मात्र या आगीत बेडरूम आणि किचन बऱ्यापैकी जळाले आहे. वागळे इस्टेट,रघुनाथ नगर, रहेजा गार्डन हे मोठे गृहसंकुल आहे. त्या संकुलातील तळ अधिक १२ मजली अस्कॉना बिल्डिंगच्या पाच मजल्यावर ५०३ हा रूम जयंत बर्वे यांच्या मालकीचा आहे. सद्यस्थितीत तेथे एक वयोवृद्ध आजीबाई वास्तव्याला आहेत. पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास एसीमध्ये शॉट सर्किट झाल्याने आग लागली. मात्र अचानक आग भडकली.

- Advertisement -

आग लागल्याचे लक्षात येताच त्या आजीबाईंनी घराबाहेर पडून आगीबद्दल शेजाऱ्यांना माहिती दिली. या आगीची माहिती मिळताच ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जवळपास अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. याचदरम्यान १५ ते १६ रहिवाश्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तसेच यावेळी दोन फायर इंजिन, एक जंबो वॉटर टँकर आणि दोन क्यूआरव्ही वाहन पाचारण केले होते. यावेळी कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी संतोष कदम यांनी दिली.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -