ठाण्यात टायरच्या दुकानाला भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही

fire breaks out in ceat tyers shop of krishna greenland park building in thane kasarvadavali
ठाण्यात टायरच्या दुकानाला भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही

ठाणे घोडबंदर रोडवरील कासारवडवली नाक्यावर असलेल्या माजोज टायर या शॉपला शनिवारी सकाळी आग लागली. हे दुकान सात मजली कृष्णा ग्रीनलँड पार्कच्या तळ मजल्यावर आहे. सकाळीच दुकान उघडण्यापूर्वीच आतून धूर येण्यास सुरुवात होऊन लागली. यावेळी अचानक आगीने भीषण रूप धारण केल्याने एकच खळबळ उडाली होती. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

मनोज गिरी यांच्या मालकीचे CEAT माजोज नामक टायरचे दुकान असून सकाळीच दुकान उघडण्यापुर्वीच दुकानातून धूर येण्यास सुरुवात झाली होती, हळूहळू धूर वाढून अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दल, महानगर गॅसचे अधिकारी आणि कासारवडवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले.

यावेळी, एक फायर इंजिन, एक-रेस्क्यू वाहन, एक-जम्बो वॉटर टँकर आणि एक-जेसीबी पाचारण केले होते. ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात असून दुकानात सकाळीच धूर येत असताना अचानक आगीने भीषण रूप धारण केले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झालेली नाही. या आगीत एकाच दुकानाचे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांनी दिली.