घरठाणेडोंबिवलीतील फटाके स्टॉल्समुळे वाहतुकीला अडथळा

डोंबिवलीतील फटाके स्टॉल्समुळे वाहतुकीला अडथळा

Subscribe

डोंबिवली रेल्वे स्थानक पूर्व आणि पश्चिमेतील परिसरातील वर्दळीच्या छोट्या मोठ्या रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा होईल, अशा प्रकारे फटाक्यांचे बेकायदा स्टॉल उभारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते यामध्ये आघाडीवर आहेत. हे स्टॉल हटविण्याचा पालिकेच्या फेरीवाला पथकाने प्रयत्न केला. मात्र त्यांना सत्ताधारी राजकीय पदाधिकार्‍यांकडून राज्यात आमचे सरकार आहे. एकाही फटाक्यांच्या स्टॉलला हात लाऊ नका, अशा धमक्या कर्मचार्‍यांना दिल्या जात आहेत. त्यामुळे बेकायदा स्टोल व फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेचे हतबल झाल्याचे चित्र आहे.

सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर आणि बाजारपेठांमध्ये फटाक्यांचे स्टॉल लावण्यास केडीएमसीचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी मनाई केली आहे. शहरातील 11 मैदानांवर फटाके विक्रीच्या स्टॉलना परवानगी देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या मैदानाव्यतिरिक्त कोणीही विक्रेत्याने स्टेशन परिसर, रहदारीच्या रस्त्यांवर आणि बाजारपेठांमध्ये फटाके विक्रीचे स्टॉल लावल्यास त्यावर अग्निशमन वाहनातून पाणी मारून संबंधित दुकान बंद पाडले जाणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. केडीएमसीने इशारा दिला आणि त्याची अंमलबजावणी झाली असे आजपर्यंत कधी झाले नाही, त्यामुळे केडीएमसीचे इशारे कोणीही गांभीर्याने घेत नाही. नव्हे पालिकेचा कोणाला धाक ना दरारा अशीच स्थिती आहे. त्यामुळे डोंबिवली पूर्वेतील फडके रस्ता, नेहरू रोड, मानपाडा रोड आदी स्टेशन परिसरात प्रमुख रहदारीच्या रस्त्यावर फटाके विक्रीचे बेकायदा स्टॉल उभारण्यात आले आहेत. कुठे पदपथ अडवून तर कुठे रस्ते अडवून बेकायदा फटाके स्टॉल उभारण्यात आल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आहेत. काही बेकायदा फटाके विक्रीचे स्तोल पालिकेच्या फेरीवाला पथकाने जमीनदोस्त करण्याची कारवाई देखील केली होती. मात्र पालिकेचे पथक निघून गेल्यावर त्याच जागी ते स्टॉल पुन्हा उभारण्यात आले आहेत.

- Advertisement -

बहुतांश बेकायदा फटाके विक्रीचे स्टॉल राजकीय मंडळींच्या आशीर्वादाने उभारण्यात आली आहेत. त्यामध्ये सत्ताधारी शिवसेना, भाजपाच्या मंडळींचे सर्वात जास्त दिसत आहेत. या बेकायदा स्टोलवर मंत्री, आमदार, खासदार, स्थानिक नेते माजी नगरसेवक यांचे फोटो व राजकीय पक्षांचे झेंडे लावण्यात आले आहेत. त्यामुळे अशा बेकायदा फटाके विक्रीच्या स्टोलला हात लावण्याची हिंमत पालिकेचे पथक करीत नाही. ह प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त स्नेहा करपे यांनी डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे स्थानक भागातील रस्त्यांवरून स्टॉल हटविण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी स्टोल जैसे थे असेच आहेत. रीतसर परवानगी घेऊन भागशाळा मैदानात स्टॉल लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. ह प्रभागात फटाके स्टॉलसाठी 92 अर्ज दाखल आहेत. भागशाळा मैदानात जाणार असाल तरच परवानगी देण्याचा निर्णय करपे यांनी घेतला आहे. मात्र भागशाळा मैदानात फटाके स्टॉल उभारण्यास खेळाडूंनी विरोध केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -