घरठाणेठाण्यात ‘एच 3 एन 2’ आजाराचा पहिला मृत्यू

ठाण्यात ‘एच 3 एन 2’ आजाराचा पहिला मृत्यू

Subscribe

या आजाराचा रुग्णांचा आकडा 19 वर

एकीकडे ठाणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे आता ‘एच 3 एन 2’ इन्फ्ल्युएंझा या आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. तो आकडा आता 19 झाला आहे. त्यातच बुधवारी मृत्यू झालेल्या वृद्धाला कोरोना आणि ‘एच 3 एन 2’ अशा दोन्ही प्रकारच्या आजारांची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर ‘एच 3 एन 2’ चा ठाण्यातील तो पहिला बळी म्हणून नोंदवला गेला आहे. याबाबत ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी दुजोरा दिला आहे.

ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असताना मात्र ठाणे महापालिका हद्दीतही रुग्णांसह उपचारादरम्यान मृत्यू होणार्‍या रुग्णांचा आकडा आठवड्यात तीन झाला आहे. ते तिघे 70 वर्षांवरील असून त्यांना सहव्याधी होते. त्यातच बुधवारी मृत्यू झालेल्या वृद्धाला खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना ‘एच 3 एन 2’ इन्फ्ल्युएंझा या आजाराचीही लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणी अहवालातून उघड झाले होते. आठवडाभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या तीन इतकी झाली असून त्याचबरोबर ‘एच 3 एन 2’चा पहिला मृत्यु झाल्याची नोंद झाली आहे. त्यातच बुधवारी या आजारामुळे एकाचा मृत्यु झाल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -