घरठाणेठाण्यात किरकोळ आगीच्या पाच घटना

ठाण्यात किरकोळ आगीच्या पाच घटना

Subscribe

ठाणे शहरात वेगवेगळ्या पाच ठिकाणी आगीच्या घटना काही तासांच्या अंतरांवर घडल्या आहेत. याघटनांमध्ये जंगलात, कचऱ्याला आणि भंगारातील चारचाकी वाहनांना लागली असून कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झालेली नाही. तसेच या अग्नीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे अशी माहिती आणि महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

शनिवारी रात्री १०:३६ वाजताच्या सुमारास उपवन तलावाजवळ, गणपती मंदिरासमोर, वर्तकनगर, येथील  जंगलात किरकोळ आग लागली होती. तदपूर्वी म्हणजे शनिवारी १०:२० वाजताच्या सुमारास नऊ एकरच्या गेट समोर, कोठारी कंपाउंड, टिकुजिनी वाडी रोड, मानपाडा येथे कचऱ्याला आणि भंगारामधील चारचाकी वाहनाला आग लागली होती. तर शनिवारी सुमारे ११:४७ वाजताच्या सुमारास दिवा वक्रतुंड चाळ, गणेश मंदिराजवळ, वक्रतुंड नगर, दिवा-आगासन रस्ता, येथे अनिता कांबळे यांच्या मालकीच्या खोली क्र. ०४/०५, मध्ये  लाकडी व प्लॅस्टिक साहित्याला किरकोळ आग लागली होती.तसेच रविवारी सकाळी ०८:३० वाजताच्या सुमारास उपवन तलाव समोर, उपवन रोड, उपवन,येथे  एका मनोरुग्ण व्यक्तीने कचरा पेटल्याने आग लावली होती. या घटनांची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल या विभागांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर वेळीच नियंत्रण मिळविले.तसेच कोणालाही दुखापत नसल्याची माहिती आपत्ती विभागाचे अविनाश सावंत यांनी दिली.

- Advertisement -

कारला आग
मुंबई-नाशिक महामार्ग, माजीवडा येथील लोढा कॉम्प्लेक्सजवळ, मोहम्मद सौद खान यांच्या मालकीच्या कारला मध्यरात्री १२ वाजून ०८ मिनिटांनी आग लागली. यामध्येय कोणतीही जीवितहानी नाही, कोणतीही दुखापत झालेली नसून परिस्थिती नियंत्रणात आली आहे. घटनेची माहिती मिळताच ठामपा आपत्ती व्यवस्थापन, पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दल या विभागांनी धाव घेतली होती. यामध्ये गाडीचे नुकसान झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -