घरठाणेयादव कुटुंबावर काळाचा घाला

यादव कुटुंबावर काळाचा घाला

Subscribe

एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, दोन बहिणी बचावल्या

ठाण्याच्या कळवा पूर्व घोळाई नगर येथे दोन घरांवर दरड (भूस्खलन) कोसळल्याची घटना सोमवारी दुपारच्या वेळेत घडली. यामध्ये प्रभू सुदाम यादव यांच्या घरातील त्यांच्यासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या दोन मुलींना वाचविण्यात यश आले आहे. मृतांमध्ये तीन वर्षीय असून जखमींमध्ये ५ वर्षीय चिमुरडीचा समावेश आहे. जखमींना ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यावेळी दरड कोसळली त्यावेळी दुसर्‍या घरात कोणी नव्हते. अन्यथा मृत आणि जखमींचा आकडा वाढला असता अशी माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली.

कळवा पूर्व येथील डोंगरावर घोळाई नगर हे वसलेले आहे. या घोळाईनगरच्या दुर्गा चाळ ही डोंगर परिसरात वरपर्यंत पसरलेली आहे. मागील तीन दिवसांपासून ठाण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. सोमवारीही शहरात चांगलाच पाऊस झाला आहे. त्यातच घोळाई नगर येथे दोन घरांवर सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानक दरड कोसळली. ही घटना घडली त्यावेळी यादव कुटुंब हे घरात असल्याने या दुर्दैवी घटनेत प्रभु सुदाम यादव (४५), त्यांच्या पत्नी विद्यादेवी यादव (४०) यांच्यासह रविकिशन यादव (१२), सिमरन यादव (१०), संध्या यादव (०३) यांचा दरड कोसळलेल्या डोंगरावरील मलब्याखाली सापडून मृत्यू झाला आहे. तर प्रीती (५) आणि आचाल (१८) या बहिणींना वाचविण्यात यश आले आहे.

- Advertisement -

शनिवारी रात्रीपासून कोसळत असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी तुंबण्याच्या घटना घडत होत्या, सोमवारी दिवसभरात १३३.०७ मीमी पावसाची नोंद झाली असतानाच दुपारी कळव्यातील घोलाई नगर भागातील दुर्गा चाळ या भागात दुपारी १२.३० च्या सुमारास दरड कोसळली आणि त्यात एकाच कुटुंबातील सात जण मलब्याखाली अडकले. परंतु या घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेऊन यातील दोघांना सुखरुप बाहेर काढले. यात ते किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन, टीडीआरएफ, अग्निशमन दलाचे पथक दोन अ‍ॅम्ब्युलन्स, दोन जीप आणि दोन टेम्पो घेऊन घटनास्थळी दाखल झाले.

* चार तास चालले बचावकार्य
घटनेची माहिती मिळताच दाखल झालेल्या पथकाचे जवळ जवळ चार तास बचावकार्य सुरू होते. डोंगराच्या वरील बाजूवरील दरड वेगाने खाली घरावर पडल्याने पावसात हे बचावकार्य सुरू झाले. त्यानंतर पाचही जणांना बाहेर काढण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.
दुर्दैवाची बाब म्हणजे हे सर्व एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

* १५० कुटुंबांना शाळेत हलविले
घटनेनंतर डोंगरापासून खालपर्यंत घरे आहेत, परंतु आता दरड कोसळल्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून येथील तब्बल १५० कुटुंबांना घोलाई नगर भागातील महापालिकेच्या शाळेत हलविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

* दुसरे घर रिकामे होते
दरड ही दोन घरांवर कोसळली. त्यामध्ये एका घरात सातजण होते. तर दुसर्‍या घरात कोणी नसल्याचे समोर आले अन्यथा आणखी मृत आणि जखमींचा आकडा वाढला असता. अशी भीती यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकार्‍यांनी बोलताना वर्तवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -