घरठाणेठाण्यात पाच वाहनांना आग

ठाण्यात पाच वाहनांना आग

Subscribe

वर्तकनगर येथे बिल्डिंग क्रमांक 41 समोर मोकळ्या जागेत उभ्या केलेल्या पाच वाहनांना आग लागल्याची घटना सोमवारी पहाटे चार ते सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत 2 चारचाकी, 2 रिक्षा आणि 1 दुचाकीचा समावेश आहे. यामध्ये पाचही वाहनांचे नुकसान झाले असून कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

वर्तकनगर बिल्डिंग क्रमांक 41 समोर मोकळ्या जागेत उभ्या केलेल्या वाहनांना आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवानांनी धाव घेत,तातडीने त्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांना आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यासाठी 20 मिनिटांचा कालावधी लागला. तोपर्यंत या आगीत चारचाकी,रिक्षा आणि दुचाकी अशा पाच वाहनांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी लागली की कोणी लावली हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. मात्र एखाद्या वाहनामध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
एका वाहनाने पेट घेतल्यानंतर त्याची झळ इतर वाहनांना बसल्याने त्या वाहनांनी ही पेट घेतल्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -