घरठाणेठाणे जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्ण संख्येत घट

ठाणे जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्ण संख्येत घट

Subscribe

सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सुमारे सहाशेने रुग्ण संख्या कमी

ठाणे जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट झाल्याची पाहण्यास मिळत आहे. मंगळवारी ६ हजार ६३० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच ६२९ जणांनी कोरोनाला हरवले आहे. तर सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सुमारे सहाशेने रुग्ण संख्या कमी झाल्याचे दिसत आहे.
ठाणे जिल्ह्यात ६ हजार ६३० नव्या रुग्णांची मंगळवारी भर पडल्याने एकूण रुग्ण संख्या ही ६ लाख ३४ हजार ७९३ झाली आहे. ठामपामध्ये २ हजार १९ रुग्ण आढळून आले आहेत. केडीएमसीत १ हजार ३७ रुग्णांची नोंदणी झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत १ हजार ८७३,उल्हासनगर २६३, भिवंडीत ६९, मीरा भाईंदर ७२७,अंबरनाथ १७१, कुळगाव बदलापूर १४९, तर ठाणे ग्रामीण यामध्ये ३२२ रुग्ण आढळून आले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला आहे.

मंगळवारी ५८ हजार नागरिकांचे लसीकरण
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्यात  कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार मंगळवारी रात्री आठपर्यंत ५८ हजार ८२१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ कोटी १५ लाख ८५ हजार ८२० डोसेस देण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६६ लाख ०४ हजार  १२७ नागरिकांना तर ४९ लाख ७० हजार ६४६ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात लसीकरणाचे सुमारे  ४७३ सत्र आयोजित करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -