घरठाणेमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहच्या अडचणीत वाढ

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहच्या अडचणीत वाढ

Subscribe

शवविच्छेदनाची सीडी गहाळ

कळवा पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस कर्मचारी मृत्यू प्रकरण हे आत्महत्या की हत्या याचे गूढ अद्याप उलगडू शकले नाही. या प्रकरणातील आरोपी असलेले श्यामकुमार निपुंगे यांनी तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त आणि या प्रकरणाचे तपास अधिकारी यांच्या स्टिंग ऑपरेशनने आता पुन्हा एकदा प्रकरण समोर आले आहे. तर या प्रकरणात कळवा पोलिसांनी न्यायालयात मृतकाची सीडी सापडत नसल्याचे अ‍ॅफिडेव्हिट सादर केल्याचा आरोप सध्या नाशिक ग्रामीण उप अधीक्षक असलेले श्यामकुमार निपुंगे यांनी केला आहे. या प्रकरणात आता ठाणे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे.

कळवा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सुभद्रा वसंत पवार या महिला कर्मचारीच्या मृत्यूनंतर ७ सप्टेंबर,२०१७ रोजी शवविच्छेदन केले. त्याची सीडी एक खासगी फोटोग्राफर भोगले यांनी केली. ती सीडीच आता कळवा पोलिसांना सापडत नाही. ती सीडी गेली कुठे? असा सवाल श्यामकुमार निपुंगे यांनी उपस्थित केला आहे. या आत्महत्या प्रकरणाला निपुंगे यांच्या आरोपामुळे कलाटणी मिळत आहे. एक सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी निपुंगे यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये ती आत्महत्या नाही, हत्या असल्याचे समोर आले त्या स्टिंगचा व्हिडीओ व्हायरल झाला. या प्रकरणाचे तपास अधिकारी असलेले रमेश धुमाळ यांचे हे स्टिंग ऑपरेशन आहे.

- Advertisement -

हे प्रकरण मिटवण्यासाठी धुमाळ यांनी माझ्याकडे पैशाची मागणी केली होती, असा आरोप निपुंगे यांनी केला आहे. पोलीस महिलेचे भाऊ धुमाळ यांच्याकडे सेटलमेंट करण्यासाठी आले असल्याचे स्वतः धुमाळ यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये म्हटले असल्याचे निपुंगे यांनी सांगितले. हे सर्व प्रकरण तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या दबावाखाली ठाणे पोलिसांनी मला खोट्या गुन्ह्यात अटक केल्याचा आरोप देखील निपुंगे यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -