Eco friendly bappa Competition
घर ठाणे कळवा-विटाव्यातील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश

कळवा-विटाव्यातील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश

Subscribe

कळवा विटावा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक जितेंद्र पाटील आणि उद्योजक संतोष तोडकर यांनी सोमवारी कळव्यात शिवसेनेच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. पाटील हे गेले काही दिवसांपासून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्याचर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. त्यातच तोडकर हे आव्हाड यांचे खांदे समर्थक म्हणून ओळखले जात असल्याची चर्चा आहे. या दोघांच्या प्रवेश राष्ट्रवादीला शिवसेनेने धक्का देत, मशीन कळवा याला सुरू केल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे. त्यानंतर मुंब्रा विकास आघाडीच्या माध्यमातून मशीन मुंब्रा ही हाती घेण्यात येईल असेही म्हटले जाऊ लागले आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील वाद पुन्हा पेटणार असेच दिसत आहे.

मागील काही महिन्यापूर्वी राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणामुळे आमदार आव्हाड विरुध्द खासदार शिंदे असा सामना वारंवार कळवा- मुंब्र्यात पहावयास मिळाला आहे. मुंब्य्रात असेल किंवा कळव्यात उड्डाणपुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम असेल या दोन्ही ठिकाणी शिंदे विरुध्द आव्हाड यांच्यात चांगलीच शाब्दीक चकमक उडाली होती. तसेच हा मतदार संघ लोकसभा आणि विधानसभेच्या दृष्टीने देखील महत्वाचा मानला जात होता. लोकसभेला राष्ट्रवादीकडून श्रीकांत शिंदे यांना मदत केली जात होती. तर विधानसभेत शिवसेनेकडून राष्ट्रवादीली सहकार्य केले जात होते. परंतु त्याची चर्चा कुठेही होत नव्हती. राज्यातील सत्तेचे समीकरण बिघडले आणि ही पडद्या मागची दोस्ती उघडपणे दुष्मनीत बदलली आणि त्यातूनच शिवसेनेकडून मिशन कळवा हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार पहिला मासा जितेंद्र पाटील यांना गळाला लावण्यात शिवसेनेला यश आले आहे. दोन महिन्यापूर्वी जितेंद्र पाटील हे पक्ष सोडणार असल्याचे बोलले जात होते. परंतु त्यांची मनधरणी करण्यात आली होती. अखेर सोमवारी त्यांनी राष्ट्रवादीला रॅम रॅम करत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -