ठामपाचे माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांना अटक

जीएसटी न भरल्याचा ठपका, रवानगी 9 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत

सेवा कर जमा केला परंतु सरकारला जीएसटी न भरल्याचा ठपका ठेवत ठाणे महापालिकेतील शिवसेनेचे माजी ज्येष्ठ आणि स्थायी समिती सभापती संजय देवराम भोईर यांना गुरुवारी जीएसटी भिवंडी आयुक्तालयाने अटक केली. त्यांना न्यायालयाने येत्या 9 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. तर गेल्या वर्षभरात भिवंडी आयुक्तालयाने 23 जणांना अटक केलेली आहे. जीएसटीच्या भिवंडी आयुक्तालयाने मेसर्स विक्की एंटरप्राइझच्या विरोधात संकलित परंतु न भरलेल्या सेवा कराचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये प्राप्त कर्त्यांकडून 2 कोटी 26 लाख वसूल केले. परंतु सेवा कर दायित्व सोडले नसल्याचे तपासात पुढे आल्याचे म्हटले. तसेच तपासादरम्यान गोळा केलेल्या भौतिक पुराव्यांच्या आधारे, संजय भोईर यांना गुरुवारी 23 फेब्रुवारी 2023 रोजी सीजीएसटी कायद्यान्वये अटक करण्यात आली.

तसेच पडताळणी दरम्यान संबंधित विभागाच्या लक्षात आले की, भोईर यांनी सन 2008 मध्ये सेवा कर नोंदणी केली आहे आणि फक्त 2012-13 आणि 2013-14 या कालावधीसाठी एसटी-3 रिटर्न भरले आहेत. तसेच त्यांनी 2008-09, 2009-10, 2010-11, 2011-12, 2014-15, 2015-16, 2016-17 आणि 2017-18 (एप्रिल, 2017 ते जून 2017) या कालावधीसाठी एसटी-3 रिटर्न भरलेले नाहीत किंवा सेवा कर भरलेले नाही. असा ठपका ठेवला आहे. या
विभागाकडे उपलब्ध कागदोपत्री पुराव्यांच्या आधारे, जमा केलेला परंतु सरकारला न भरलेला सेवा कर 2.26 कोटी रुपये इतका असल्याने जीएसटी कायद्यानुसार कारवाई झाली आहे.

आतापर्यंत 23 जण अटकेत
सेवा कर म्हणून केंद्र सरकारच्या क्रेडिटमध्ये जमा केलेली रक्कम भरण्यात अयशस्वी झाले. हे प्रकरण उॠडढ मुंबई झोनने कर फसवणूक करणार्या आणि कर चुकवणार्यांविरुद्ध सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग आहे. आतापर्यंत उॠडढ भिवंडी आयुक्तालयाने गेल्या वर्षभरात 23 जणांना अटक केली आहे.