घरठाणेशहापुरातील चार हजार ग्राहक वीज जोडणीच्या प्रतीक्षेत

शहापुरातील चार हजार ग्राहक वीज जोडणीच्या प्रतीक्षेत

Subscribe

शहापूर तालुक्यात वीज मीटरचा तुटवडा निर्माण झाल्याने आदिवासी गाव पाड्यातील ४ हजार नवीन ग्राहक गेल्या वर्षांपासून वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत.

शहापूर तालुक्यात वीज मीटरचा तुटवडा निर्माण झाल्याने आदिवासी गाव पाड्यातील ४ हजार नवीन ग्राहक गेल्या वर्षांपासून वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. वीज जोडणीचे पैसे भरूनही वीज मीटर मिळत नसल्याने महावितरण कंपनीविरोधात नागरिकांत प्रचंड संताप व्यक्त होत आहे. दिवसेंदिवस वीज जोडणीचे ग्राहक वाढत असले तरी महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांवर पैसे भरूनही केवळ वीजेअभावी अंधारात रहाण्याची वेळ आली आहे. महावितरण कंपनीने वीज ग्राहकांना लवकरात लवकर वीज जोडणी द्यावी, अशी मागणी आता ग्रामीण भागात जोर धरु लागली आहे. लॉकडाऊन दरम्यान अनेक वीज ग्राहकांची थकबाकी वाढल्याने महावितरण कंपनी तोट्यात सुरु असल्याने महावितरणकडून सक्तीची वसुली सुरु असून थकबाकी न भरल्यास मीटर जोडणी कट करण्यात येत आहे.

वसुली न झाल्यास कर्मचार्‍यांवरच कारवाईचा इशारा महावितरणकडून देण्यात आला आहे. दुसरीकडे महावितरणकडे घरगुती वीज मीटरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक घरगुती, वाणिज्यिक, कंपनी, हॉटेल, शेतकर्‍यांना बोअरवेल व विहिरीसाठी ग्राहक वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. ज्या ग्राहकांचे मीटर फॉल्टी आहेत. अशा अनेक ग्राहकांच्या वीजमीटरच्या बदलाची मागणी आहे.

- Advertisement -

लॉकडाऊनच्या काळात विजेचे मीटर उत्पादन करणार्‍या कंपन्या बंद होत्या. आता काही प्रमाणात उत्पादन सुरू झाले आहे. त्यामुळे लवकरच सर्वांना वीज मीटर उपलब्ध करुन देण्यात येतील. सुमारे दोन हजारांच्या वर मीटर बदलण्याची मागणी आली आहे. तर दोन हजार जणांनी नवीन मीटरसाठी व वीज जोडणीकरता अर्ज केले आहेत.
– अविनाश कटकवार, उपअभियंता शहापूर, महावितरण कंपनी

महावितरणकडे आधी कृषीपंपांची प्रतीक्षा यादी असायची. ज्येष्ठतेनुसार यातील जोडणी केली जात होती. वीज मीटरचा तुटवडा निर्माण झाल्याने आता सिंगल फेज मीटरसाठीही नागरिकांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे. वीज मीटर उपलब्ध झाल्यानंतर ग्राहकांना वीज जोडणी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना कशाप्रकारे बोलावलं जाणार, जाणून घ्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -