घरठाणेठाण्यातील खड्ड्यांचे विघ्न दूर करण्यासाठी साक्षात विघ्नहर्त्याचेच आवाहन!

ठाण्यातील खड्ड्यांचे विघ्न दूर करण्यासाठी साक्षात विघ्नहर्त्याचेच आवाहन!

Subscribe

गणपतीचे आगमन होत असूनही खड्डे न बुजविल्यामुळे शेवटी प्रतिकात्मक स्वरुपात स्वतः गणपती बाप्पानीच आपले वाहन मूषकराज यांच्यासह येऊन काँग्रेस कार्यकर्त्यांकडून खड्डे बुजवून आंदोलन केले याप्रसंगी बोलताना प्रतिकात्मक गणपती बाप्पाची वेशभूषा केलेल्या कार्यकर्त्यांने ठाण्यातील ठिकठिकाणी खड्ड्याबाबत आपली खंत व्यक्त केली.

ठाणे: गणेशोत्सवासाठी एवघे दोन ते तीन राहिले आहेत. लावकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. तत्पूर्वीच ठाण्यात पडलेले रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी रविवारी काँग्रेसच्या आंदोलनात चक्क गणपती बाप्पा त्यांचे वाहन मूषकराज यांच्यासह अवतरले होते. प्रतिकात्मक गणपती बाप्पाच्या आदेशानुसार ठाण्यात ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

हे ही वाचा – खरा वारसा कोण चालवतंय? जनता निवडणुकीतून दाखवेल, शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

- Advertisement -

बुधवारी 31 ऑगस्ट रोजी गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. ठाण्यातील रस्त्यावरील खड्ड्याबाबत वारंवार निदर्शनास आणूनही ठाणे महापालिकेतील प्रशासन अद्याप जागी झाली नसल्याचे चित्र ठाण्यात जागोजागी दिसत असलेल्या खड्ड्याबाबत दिसत आहे खड्ड्याने कालच एका युवकाचा बळी गेला असून आता गणपतीचे आगमन होत असूनही खड्डे न बुजविल्यामुळे शेवटी प्रतिकात्मक स्वरुपात स्वतः गणपती बाप्पानेच आपले वाहन मूषकराज यांच्यासह येऊन काँग्रेस कार्यकर्त्यांकडून खड्डे बुजवून आंदोलन केले याप्रसंगी बोलताना प्रतिकात्मक गणपती बाप्पाची वेशभूषा केलेल्या कार्यकर्त्यांने ठाण्यातील ठिकठिकाणी खड्ड्याबाबत आपली खंत व्यक्त केली.

काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जागोजागी पडलेले खड्डे बुजविण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले या आंदोलनाबाबत बोलताना शहर काॅग्रेस सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे यांनी सांगितले की, शहरातील खडय़ांची समस्या ही आजची नाही, मागील कित्येक वर्षे शहरात नवीन रस्ते केले जात आहेत. त्यावर कोटय़ावधींचा खर्च केला जात आहे. मात्र पावसाळ्यात पुन्हा त्याच रस्त्यांवर खड्डे पडत आहेत.मागील पाच वर्षात रस्त्यांवर 1500 कोटींच्या आसपास रस्त्यांवर खर्च करण्यात आले आहेत.तर दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर पडणा-या खडय़ांसाठी चार ते पाच कोटींचा खर्च केला जात आहे. मात्र रस्ते चांगले केले तर पुन्हा त्यावर खड्डे पडतील कशाला असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी ठाण्यातून सुटणार मोफत बस, मुख्यमंत्री शिंदेंकडून गिफ्ट

यंदा देखील रस्त्यांवर पडलेल्या खडय़ांसाठी 4 कोटींचा खर्च केला जात आहे. मात्र खड्डे जैसे थे असेच आहेत. खडय़ांवर तात्पुरत्या स्वरुपात मुलामा टाकला जात आहे.कधी कोल्ड मिक्स, कधी हॉट मिक्स तर कधी आणखी काही वेगळे तंत्रज्ञान वापरले जात आहे. मात्र ही सर्व तत्रज्ञान फेल होत आहेत.त्यामुळे ठाणोकरांच्या कररुपी पैशांचा चुराडाच करण्याचे काम पालिका प्रशासनाकडून सुरु असल्याचेच दिसत आहे. हे आंदोलन शहराध्यक्ष ऍड विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली केले असून यावेळी शहर काॅग्रेस उपाध्यक्ष धर्मवीर मेहरोल, ओ.बी.सी.विभाग अध्यक्ष राहुल पिंगळे,अॅड हिदायत मुकादम,किशोर कांबळे,प्रवीण खैरालिया,अफजल तलवलकर,सुरेन भोई,हेमंत भोई, दिनेश मेहरोल,भरत भोई, देविचंद भक्त,संजय घाग,साहिल सुर्यवंशी,राजा चिंडालिया,अजय चिंडालिया आदि पदाधिकारी सहभागी झाले होते.

हे ही वाचा – ठाण्यात सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप परवानगी देण्याचा वेग वाढला, मंडळांची संख्याही वाढली

 

Edited By – Nidhi Pednekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -