घर ठाणे सार्वजनिक गणेश मंडळासाठी ठाणे महापालिकेतर्फे 'गणेश आरास स्पर्धा'

सार्वजनिक गणेश मंडळासाठी ठाणे महापालिकेतर्फे ‘गणेश आरास स्पर्धा’

Subscribe

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी गणशोत्सव आरास स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सार्वजनिक मंडळांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासक तथा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे. स्पर्धेतील विजेत्या सार्वजनिक मंडळाना पहिले पारितोषिक १० हजार , दुसरे पारितोषिक ७ हजार ५०० व तिसरे पारितोषिक ६ हजार ५०० अशी एकूण आठ बक्षिसे, स्मृतीचिन्हे आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येईल. आरास स्पर्धेबरोबर ‘उत्कृष्ट मुर्ती’ आणि ‘स्वच्छता’ या साठी पारितोषिके देण्यात येतील.

या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संस्थांना तसेच गणेशोत्सव मंडळांना अर्जाचे नमुने पांचपाखाडी येथील महापालिका भवन, पहिला मजला माहिती व जनसंपर्क विभाग, येथे सकाळी ११ ते दुपारी १.३० व दुपारी २.३० ते ५ या वेळेत  मिळतील.अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ८ सप्टेंबर २०२३ अशी असून ह्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाही.
सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेमधील सहभागी मंडळांना निर्धारीत केलेल्या अटी व शर्ती लागू राहतील असेही महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -