Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर ठाणे फडके मैदानात कचऱ्याचे साम्राज्य

फडके मैदानात कचऱ्याचे साम्राज्य

Subscribe

केडीएमसी घनकचरा व्यवस्थापन विभागाचा ढिसाळ कारभार

 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कल्याण पश्चिमेतील फडके मैदानात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून याबाबत केडीएमसी प्रशासनाकडे तक्रार करून देखील याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप माजी नगरसेवक तथा शिवसेना उपशहर प्रमुख मोहन उगले यांनी केला असून यामुळे केडीएमसी घनकचरा व्यवस्थापन विभागाचा ढिसाळ कारभार दिसून येत आहे. गेल्या ६ महिन्यांपासून कल्याण शहरात विविध लोकवस्तीच्या ठिकाणी कचऱ्याच्या गाड्या लागतात. फडके मैदानाच्या आजूबाजूला देखील अशाच प्रकारच्या कचर्याच्या गाड्या उभ्या राहत असून मैदानात विविध कार्यक्रम होत असून कार्यक्रम झाल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात कचरा होत असतो.
याचा त्रास येथील नागरिकांना होत असून याबाबत घनकचरा उपायुक्त अतुल पाटील यांच्याकडे वारंवार तक्रार करून देखील याबाबत कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. यामुळे हे मैदान फक्त क्रीडा प्रेमींसाठी ठेवण्यात येऊन इतर कार्यक्रमांना याठिकाणी बंदी घालण्याची मागणी मोहन उगले यांनी केली आहे. दिवसाढवळ्या फडके मैदानत आणि आजूबाजूला कचरा असतो. याबाबत कर्मचार्यांना याठिकाणी नियमित कचरा उचलण्याचे निर्देश देण्याचे आणि उपायुक्त अतुल पाटील यांची दुसऱ्या विभागात बदली करण्याची मागणी उगले यांनीपालिका आयुक्तांकडे केली आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -