घरठाणेबदलापुरात गॅस गळतीने उडाली खळबळ, तर भिवंडीत भीषण आगीच्या घटनेत १५ गोदाम...

बदलापुरात गॅस गळतीने उडाली खळबळ, तर भिवंडीत भीषण आगीच्या घटनेत १५ गोदाम खाक

Subscribe

मुंबई शहराच्या जवळील असलेल्या ठाणे जिल्ह्यात गुरुवारी रात्री दोन भीषण घटना घडल्या आहेत. ठाण्यातील बदलापूरमध्ये एका कंपनीतून गॅस गळती होत असल्याने आसपासच्या परिसरात खळबळ उडाली होती. तर दुसरीकडे भिवंडीत एका गोदमाला लागलेल्या भीषण आगीत १५ गोदाम जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे.

बदलापूरच्या एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत गुरुवारी रात्री १०.२२ च्या सुमारास रासायनिक गॅसगळती झाल्याची घटना समोर आली होती. या गॅस गळतीमुळे स्थानिक नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होण्यास सुरुवात झाली तर अनेकांना उलट्या, पोटात मळमळ होण्याचा त्रास जाणवू लागला होता. या गॅस गळतींमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच अग्निशमन दलाने तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.

- Advertisement -

बदलापूर शहरातील शिरगाव, आपटेवाडी भागातील नागरिकांना हा त्रास जाणवत होता. एमआयडीसी भागातील नोबल इंटर मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत ही गॅस गळती झाली. कंपनीत एका रिॲक्टरमध्ये क्रुड ऑईल साठीच सल्फ्युरिक ॲसिड आणि बेंझाईन डिहायड्रेड या दोन केमिकल्स मिश्रण सुरू होतं. मात्र त्यासाठी लागणारा तापमान नियंत्रित करताना चूक झाल्याने या रिॲक्टरमधून गॅस गळती झाली. जवळपास दोन तासांनी म्हणजे रात्री ११.२४ मिनिटांनी अग्निशमन दलाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांना घाबरण्याचे कारण नसल्याचे बदलापूर अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

तर दुसरीकडे भिवंडीत एका गोदमाला लागलेल्या भीषण आगीत १५ गोदाम जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर शर्थीच्या प्रयत्नांनानंतर जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले आहे. परंतु या घटनेत १५ गोदामांमधील सामानांचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले.


अनलॉकवरून सावळा गोंधळ


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -