घरठाणेकल्याण-डोंबिवलीच्या रस्त्यांवर धावणार आता युरोपची 'युराबस'

कल्याण-डोंबिवलीच्या रस्त्यांवर धावणार आता युरोपची ‘युराबस’

Subscribe

कॉसिस ई-मोबिलिटी तर्फे के.डी.एम.टी ला 107 ई-बसेसचा पुरवठा

कल्याण : कॉसिस ई-मोबिलिटी, एक पूर्णतः शून्य उत्सर्जन जनसमाज प्रवास (मास ट्रान्झिट) आणि लंडनच्या ‘कॉसिस ग्रुप लिमिटेड’ चा एक भाग असलेली कंपनी आहे, हिला के.डी.एम.सी कडून 107 इलेक्ट्रिक बस पुरविण्याचा हा कार्यदेश मिळालेला आहे.

युराबस ही बर्लिनस्थित ई-बस, कॉसिस ई- मोबिलिटीचे एक उत्पादन असून कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्र आणि आसपासच्या भागांमध्ये फिरताना दिसणार आहे. कॉसिस ई-मोबिलिटीला बारा वर्षांच्या कालावधीसाठी वेट लीज मॉडेल तत्त्वावर, प्रति किमी आधारावर 107 पूर्णपणे तयार केलेल्या 9 मीटर, मिडी, चालकांसह पूर्णतः इलेक्ट्रिक ए.सी / नॉन-ए.सी बसेस आणि संबंधित इलेक्ट्रिकल आणि नागरी पायाभूत सुविधा खरेदी आणि देखभाल करण्यासाठी लेटर ऑफ अवॉर्ड मिळालेले आहे.

- Advertisement -

के.डी.एम.सी ला देण्यात येणाऱ्या 9 मीटरच्या ‘युराबस’चे जीवनचक्र खर्च इतरांच्या तुलनेत सर्वांत कमी आहे. त्याची वजनास हलकी मॉड्युलर युरोपियन डिझाइनची संकल्पना कमी देखभाल आणि सेवाकालचा खर्च आणि त्यासोबत उच्च श्रेणी व दीर्घ बॅटरी लाइफ एकत्रित केल्याने पारिस्थितिक व्यवस्थेला (इकोसिस्टमला) एक अनोखा फायदा होतो. भक्कम बॅटरीमुळे जटिल चार्जिंग पायाभूत सुविधांची गरज भासत नाही. आणि यामुळे रात्री चार्जिंग करताना अनुकूल वीज दरांचा फायदा चालकांना (ऑपरेटर्सना) होतो.

कॉसिस ई-मोबिलिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. रवी कुमार पंगा म्हणाले, “आम्हाला हे जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे की, के.डी.एम.टी ला आमच्या 107 ई-बसेसचा पुरवठा करण्याचा अधिकार आम्हाला मिळालेला आहे. आमच्या बसेस कल्याण – डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर आणि जवळपासच्या मार्गावर आता धावताना दिसतील. के.डी.एम.टीच्या मोठ्या प्रमाणात वाहतूक शाश्वत ई-मोबिलिटी उपाय प्रदान करण्याच्या प्रयत्नात त्यांच्याशी भागीदारी करण्यात आम्हाला आनंद होत आहे. इंधनाच्या किंमती आकाश गाठत आहेत शिवाय पर्यावरणावर दुष्परिणाम होत आहे आणि अशा वेळेस आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे की आमच्या बसेस घातक उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्यात महत्त्वपूर्ण योगदान देतील आणि आमच्या पर्यावरण-अनुकूल इलेक्ट्रिक बसद्वारे पूर्णतः शून्य उत्सर्जन वातावरण तयार करण्यास हातभार लावतील, ज्यामुळे प्रवाशांना आरामदायी आणि उत्कृष्ट प्रवासाचा अनुभव देखील मिळेल.’

- Advertisement -

के.डी.एम.टी चे महाव्यवस्थापक (परिवहन) डॉ. दिपक डी. सावंत म्हणाले, “आम्ही खूप खुश आहोत आणि कॉसिस ई-मोबिलिटीबरोबरच्या या भागीदारीची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. ही भागीदारी सर्वसामान्यांसाठी आणि पर्यावरणाकरिता अनुकूल होणार आहे कारण हा प्रवाशांना किफायतशीर पर्याय आहे आणि इलेक्ट्रिक बसद्वारे पूर्णतः शून्य उत्सर्जन हे पर्यावरणासाठी मोठे योगदान देण्यास मदत करेल. आम्ही खूप खुश आहोत कारण कॉसिस ई-मोबिलिटीशी भागीदारी करणारे आणि कल्याण-डोंबिवली मार्गावर युराबस बसेस चालू करणारे आम्ही पहिलेच आहोत. सर्वोत्तम आणि पर्यावरण-अनुकूल भविष्यासाठी पारिस्थितिक व्यवस्थेमध्ये (इकोसिस्टममध्ये) याचे योगदान मिळेल याबाबतीत आम्हाला खात्री आहे.”


आठवड्यातून 3 दिवस ऑफिसमध्ये या; TATA चा मूनलाइटिंगबाबत कर्मचाऱ्यांना इशारा


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -