घरठाणेत्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर जयंती निमित्त शाळेला पाण्याची टाकी भेट

त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर जयंती निमित्त शाळेला पाण्याची टाकी भेट

Subscribe

विद्यार्थ्यांना दप्तर व खाऊ वाटप

शहापूर । माता रमाई महिला मंडळ वासिंद यांच्या वतीने दरवर्षी त्यागमूर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. या वर्षीही या मंडळाने रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीचे औचित्य साधून एक अगळवेगळ दातृत्वाचे काम करत बुधवारी माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा अंजली संजय भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली शहापूर तालुक्यातील सारमाळ येथील आदिवासी वस्ती असलेल्या शिंगेपाडा येथील वासिंद केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगेपाडा शाळेला पाण्याची टाकी, लोखंडी स्टॅण्ड, पाइप लाइन भेट दिले. तर वासिंद येथील आदिवासी वस्ती असलेल्या बामणपाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर आणि खाऊ वाटप करून त्यागमूर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी केली.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वासिंद ग्रामपंचायत सदस्य तथा विद्या विकास मंडळाचे सदस्य आणि माजी सेक्रेटरी विलास उर्फ बाळू जगे, विद्या विकास मंडळाचे चेअरमन लडकू पवार, श्रावस्ती बहुजन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामा घोडेस्वार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा निलम वाघ उपस्थीत होते तर निर्मला आढाव, आशा कोचूरे, लीला यादव, जनाबाई भालेराव, शांताबाई घोडेस्वार, सुनंदा शिंदे, लता साळवे, अ‍ॅड. प्रतिभा कांबळे, अर्चना खरात, अर्चना शिंदे, रेश्मा सोनवणे, मनिषा सुरळके, नरेंद्र कोचुरे, प्रविण केदारे, किरण जाधव, गणेश अहिरे, लकी जाधव, हर्षद जगे, ग्रामस्थ सुधीर शिंगे, महेश बांगारे, प्रदीप भला, दिपाली वाख, जनाबाई केंगले, चांगुणाबाई आगीवले यांची प्रमुख उपस्थिती होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -