Friday, February 26, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे धक्कादायक! धावत्या गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये मुलीवर बलात्कार

धक्कादायक! धावत्या गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये मुलीवर बलात्कार

या बलात्काराच्या तक्रारीनंतर ठाणे पोलीस विभागात एकच खळबळ

Related Story

- Advertisement -

ठाणे शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाण्यात धावत्या ट्रेनमध्ये एका मुलीवर बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बलात्काराच्या तक्रारीनंतर ठाणे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा धक्कादायक प्रकार गेल्या बुधवारी सकाळी सातच्या सुमारास घडला.

बुधवारी सकाळी सातच्या सुमारास गोरखपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एका मुलासह मुलगी एकत्र प्रवास करत होते. दरम्यान, मुलाने आपल्या सोबत असलेल्या मुलीला ट्रेनच्या शौचालयात नेले. त्यानंतर या धावत्या ट्रेनमध्ये तिच्यावर या मुलाने बलात्कार केला. त्यानंतर पीडित मुलीने मुंबईत पोहोचल्या कुरार पोलिसात तक्रार दिली होती. पीडित मुलीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस ठाण्यात खळबळ उडाली. पीडितेच्या तक्रारीची नोंद घेत पोलिसांनी घडलेल्या घटनेचा शोध घेण्यास सुरूवात केली. मात्र गोरखपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये आरोपीने त्याच्या सोबत असणाऱ्या मुलीवर अतिप्रसंग केल्यानंतर त्याने पळ काढला. मात्र गोरखपूर एक्स्प्रेस ट्रेन मुंबईत पोहोचताच पीडित मुलीने कुरार पोलिसात धाव घेत झालेला सर्व प्रकार सांगितला आणि या प्रकारासंदर्भात तक्रार दाखल केली.

१९ वर्षीय आरोपीविरोधात गुन्हा दाखल

- Advertisement -

या घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी १९ वर्षीय आरोपी युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण रेल्वेशी संबंधित असल्याने कुररा पोलिसांनी पुढील कारवाईसाठी या प्रकरणाची फाइल ठाणे रेल्वे पोलिसांच्या ताब्यात सोपवली असल्याचे सांगितले जात आहे. धावत्या गोरखपुर एक्सप्रेस ट्रेनमध्ये हा प्रकार केल्यानंतर आरोपी फरार झाल्याची माहिती मिळतेय. तर पोलिस या आरोपीचा शोध घेत असून अद्याप आरोपी पकडला गेला नाही. लवकरच पोलीस या आरोपीला ताब्यात घेतील, असा पोलिसांचा दावा आहे.

- Advertisement -