घरठाणेआरटीई प्रवेश जुनिअर आणि सिनिअर केजीत द्या- काँग्रेसची मागणी

आरटीई प्रवेश जुनिअर आणि सिनिअर केजीत द्या- काँग्रेसची मागणी

Subscribe

आरटीई कायद्या अंतर्गत २५% राखीव जागांवरील शाळा प्रवेशासंदर्भात थेट पहिलीत प्रवेश न देता तो जुनिअर आणि सिनिअर केजी या वर्गात देण्यात यावा अशी मागणी ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते व सरचिटणीस सचिन शिंदे आणि समता विचार प्रसारक संस्था यांनी केली आहे या मागणीचे पत्र त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिक्षण विभागाला दिले आहे.
बालकांना मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार २००९ (RTE) अंतर्गत प्रवेशासाठी वय मर्यादा, प्रवेशाचा वर्ग प्ले ग्रुप/ नर्सरी, ज्युनिअर केजी, सीनियर केजी, इयत्ता १ ली  यांमधील सामाजिक मागास व आथिर्क मागास असलेल्या प्रवर्गासाठी इयत्ता ८ वी पर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण मिळाले पाहिजे अशी शासनाची योजना आहे.

या योजनेअंतर्गत रजिस्टर झालेल्या सर्व शाळांमध्ये प्ले ग्रुप /नर्सरी पासून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला पाहिजे परंतु असे होत नाही.बहुतांश शाळांमध्ये इयत्ता १ली पासूनच प्रवेश साठी अर्ज करता येतो आहे. पालकांना आपल्या मुलांसाठी प्ले ग्रुप/ नर्सरी जुनियर केजी, सिनियर केजी साठी अर्ज करायला मिळत नाही आणि ॲडमिशन होत नाही.त्याचा परिणाम प्लेग्रुप नर्सरीची फी सुद्धा ६० ते ७० हजार रुपये भरावी लागते. जर अशा वेळेत या योजनेचा लाभ प्ले ग्रुप / नर्सरी, ज्युनियर केजी,सीनियर केजी साठी पालकांना आणि विद्यार्थ्यांना मिळत नसल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान देखील होत आहे. मोठ्या प्रमाणात शाळा रजिस्टर केलेल्या आहेत.परंतु एकाही शाळेमध्ये प्लेग्रुप नर्सरी,ज्युनिअर केजी,सिनियर केजी साठी जागा दाखवत नाहीये. त्यामुळे राज्य सरकारने या विषयात जातीने लक्ष घालून लवकरात लवकर व आरटीआय प्रवेश सुरु होण्यापूर्वी कारवाई करावी आणि प्लेग्रुप,जुनिअर आणि सिनिअर केजी तच बालकांना प्रवर्ष देण्यात यावा अशी मागणी ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे आणि समता विचार प्रसारक संस्थेने केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -