घरठाणेबाजारात जाताय? सावधान! ठाण्यात तीन दिवसात २३ फेरीवाले पॉझिटिव्ह

बाजारात जाताय? सावधान! ठाण्यात तीन दिवसात २३ फेरीवाले पॉझिटिव्ह

Subscribe

नाहक गर्दी करणाऱ्या ठाणेकर नागरिकांनी आता सावध राहण्याची वेळ आली आहे

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नागरिक मात्र याबाबत गंभीर दिसत नाहीत. त्यामुळे आता ठाण्यातील जांभळीनाका आणि कोपरी या बाजारात खरेदी करण्यासाठी नाहक गर्दी करणाऱ्या ठाणेकर नागरिकांनी आता सावध राहण्याची वेळ आली आहे. सलग तीन दिवसात केलेल्या १ हजार ८४ जणांच्या कोरोना चाचणीत २३ जणांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यातच आपण कळत न कळत भाजी किंवा किराणा अथवा मसाले पदार्थ फेरीवाल्यांकडून खरेदी करताना कोरोना पॉझिटिव्ह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शन सूचनेनुसार लॉकडाऊन काळात अत्यावश्यक भाजीमार्केट, फळमार्केट, मसालाधान्य मार्केट, कांदा बटाटा मार्केट तसेच मच्छी मार्केट यांना योग्य ती खबरदारी घेत विक्री करण्याची मुभा दिली आहे.

महापालिका प्रशासनाने शहरातील सर्वच मार्केटमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. ठाणे महापालिकेच्यावतीने या मुख्य आणि कोपरी या मार्केट मधील भाजी मार्केट, मसाला मार्केट, कांदा बटाटा मार्केटमधील सर्वांची सोमवारपासून अँटीजन टेस्ट करण्यास सुरुवात केली आहे. सलग तीन दिवस केलेल्या कोरोना चाचणीत २३ जण पॉझिटिव्ह सापडले आहे. त्यामध्ये कोपरीत पहिल्या २१६ पैकी ६ जण पॉझिटिव्ह असल्याची बाब पुढे आली. दुसऱ्या दिवशी ९२ पैकी ५ तर आज तिसऱ्या दिवशी ४६ पैकी ६ पॉझिटिव्ह सापडले आहेत. तसेच जांभळीनाका येथे पहिल्या दिवशी केलेल्या ३६० चाचणी पैकी ४ जण पॉझिटिव्ह मिळून आले आहेत. दुसऱ्या दिवशी २२८ पैकी २ आणि तिसऱ्या दिवशी केलेल्या १३६ चाचणीत कोणीही पॉझिटिव्ह सापडलेला नाही. अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे बाजारपेठेत जाताना स्वतःची काळजी असे आवाहन करण्यात येत आहेत.

- Advertisement -

 

 

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -