घरठाणेउल्हासनगरात अभय योजनेला चांगला प्रतिसाद

उल्हासनगरात अभय योजनेला चांगला प्रतिसाद

Subscribe

उल्हासनगर । उल्हासनगर महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने 26फेब्रुवारी पासून अभय योजना लागू करण्यात आली. या अभय योजनेस उल्हासनगरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. या चार दिवसात सहा कोटींपेक्षा अधिक मालमत्ता कर वसुली करण्यात आली असल्याची माहिती मालमत्ताकर विभागाचे अधिकारी जेठा कर्मचनंदानी यांनी दिली. उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने 2023-2024 करीता 26 फेब्रुवारी ते 3 मार्च 2024 या कालावधीत मालमत्ता करावरील विलंब शास्ती माफ करण्यासाठी अभय योजना लागू करण्यात आली. त्यानुसार शहरातील सर्व नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा करून विलंब शास्ती माफीचा लाभ घेऊन आपल्या थकीत कराचा भरणा करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त अजीज शेख यांनी केले.

26फेब्रुवारी रोजी लागू करण्यात आलेली अभय योजनेला मालमत्ता धारकांनी चांगला प्रतिसाद दिला. आता प्रयत्न सहा कोटींपेक्षा अधिकची करवसुली झाली असून 3 मार्चपर्यंत वीस कोटींपर्यंत हा आकडा वाढण्याची शक्यता मालमत्ता कर विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आली. मालमत्ता कर वरील विलंब शास्ती माफ करावी यासाठी स्थानिक राजकीय नेत्यांनी मनपा प्रशासनाकडे मागणी केली होती. परंतु या अभय योजने बाबत शहरात कोणताही प्रचार किंवा नागरिकांना जागरुक करण्यासाठी मनपाकडून पुरेसा प्रयत्न केला नसल्याने या अभय योजनेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे बोलले जात आहे. उल्हासनगर महानगरपालिके ने 2024- 25 या आर्थिक वर्षात मालमत्ता करातून 156 कोटी 96 लाख रुपयांच्या करवसुलीचे उद्दीष्ट आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -