घरठाणेग्रामपंचायतीचे सरपंच सकाळी राष्ट्रवादीत, दुपारी भाजप तर संध्याकाळी शिवसेनेत

ग्रामपंचायतीचे सरपंच सकाळी राष्ट्रवादीत, दुपारी भाजप तर संध्याकाळी शिवसेनेत

Subscribe

राजकारणात कोण कधी कोणत्या पक्षात जाईल याचा नेम नाही. असाच काहीसा प्रकार मुरबाड तालुक्यातील भुवन ग्रामपंचायतीच्या संरपंच पदाच्या निवडीनंतर पहायला मिळत आहे.

राजकारणात कोण कधी कोणत्या पक्षात जाईल याचा नेम नाही. असाच काहीसा प्रकार मुरबाड तालुक्यातील भुवन ग्रामपंचायतीच्या संरपंच पदाच्या निवडीनंतर पहायला मिळत आहे. सकाळच्या सुमारास भुवन ग्रामपंचायतीतील निवनियुक्त सरपंच, उपसरपंच कुटुंबासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमोद हिंदूराव यांच्याकडून शुभेच्छा मिळवत होते. तर हेच पदाधिकारी दुपारी मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते शुभेच्छा स्विकारत होते. तर संध्याकाळी जिप उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते शिवसेनेची ग्राम पंचायत म्हणून जाहीर करत ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकल्याची घोषणा करत होते. अवघ्या काही तासांच्या फरकाने झालेल्या या राजकीय नाट्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

राजकीय पक्षांच्या अधिकृत चिन्हांशिवाय होणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आपल्याच पक्षाचा वरचष्मा असल्याचे सांगण्यासाठी राजकीय पक्षांकडून मोठमोठे दावे केले जातात. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर अशा दाव्यांची मोठी मालिकाच ठाणे जिल्ह्यात पहायला मिळते आहे. मात्र हे दावे करण्यासाठी निवडून आलेल्या सरपंच आणि उपसरपंचांची कशी पळवापळव होते याचे बोलके चित्र मुरबाड तालुक्यात पहायला मिळते आहे. मुरबाड तालुक्यातील भुवन ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. भुवन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणात यंदा खुल्या गटातील महिलांसाठी सरपंचपद आरक्षित झाले आहे. त्यामुळे त्यासाठीही चुरस पहायला मिळत होती. यात दर्शना बांगर यांची सरपंच पदी एकमताने निवड झाली. तर उपसरपंचपदी सुनील बांगर यांची निवड झाली. सरपंच पदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंच यांनी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांची भेट घेतली. यावेळी हिंदूराव यांनी सरपंचांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसची पट्टा टाकत त्यांचा सत्कार केला. काही मिनिटात भुवन ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा असे संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित झाले.

- Advertisement -

खुद्द हिंदूराव यांनी आपल्या फेसबुक पेजवरून याची माहिती दिली. त्यानंतर दुपारी सुमारास भुवन ग्रामपंचायतींचे सरपंच आणि उपसरपंचांनी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार किसन कथोरे यांच्या बदलापूर येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी भुवन ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आल्याची माहिती त्यांना देण्यात आली. संध्याकाळी हे सदस्य सुभाष पवार यांच्याकडे जाऊन हे शिवसेनेची असल्याचे फोटोसह सोशल मीडियावर जाहीर झाले.

ग्रामपंचायतीवर एका दिवसात तीन पक्षांचे झेंडे कसे फडकले, अशा चर्चांना उधाण आले. विशेष म्हणजे ज्या कपड्यांवर या नवनियुक्त सरपंच आणि उपसरपंचानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली. त्याच कपड्यांवर भाजप आमदारांच्या भेटीला हे गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. तिनही पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी हा प्रकार केल्याची माहिती काही वेळाने समोर आली. मात्र सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस दुपारी भाजप तर संध्याकाळी शिवसना अशा एकाच दिवसात तीन पक्षांच्या प्रवास करणार्‍या भुवन ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांची चर्चा तालुक्यात रंगली असून विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती.

- Advertisement -

हेही वाचा –

अजोय मेहतांचा मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार पदाचा राजीनामा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -