Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ठाणे ठाणे पालिकेचे आजी-माजी विरोधी पक्षनेते शरद पवारांच्या भेटीला; महासभेचा मार्ग मोकळा होणार

ठाणे पालिकेचे आजी-माजी विरोधी पक्षनेते शरद पवारांच्या भेटीला; महासभेचा मार्ग मोकळा होणार

महासभा नियमानुसार होतच नाही. त्यामुळे चुकीचे ठराव पारीत केले जात आहेत. या ठरावांची अंमलबजाणी प्रशासनाकडून होऊ नये, अशा मागण्या विरोधी पक्षनेते पठाण आणि ज्येष्ठ नगरसेवक जगदाळे यांनी शरद पवार यांच्यासमोर मांडल्या.

Related Story

- Advertisement -

ठाणे महापालिकेत प्रत्यक्ष महासभा होत नसल्याने चुकीचा पायंडा पाडला जात आहे. ही बाब ठामपा आजी माजी विरोधीपक्षनेत्यांनी थेट भेट घेऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कानावर घातली. त्याचबरोबर आणखीही विषयांवर चर्चा करताना आयत्या वेळेच्या ठरावांसह चुकीच्या पद्धतीने ठाणे महानगर पालिकेची सभा होत आहे. या बाबत आपण संबधितांशी चर्चा करुन प्रत्यक्ष महासभा होण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण आणि ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांना दिले.गेली अनेक वर्षे सभागृहाचे जे कामकाज संख्या बळावर कामकाज करुन त्यामध्ये नगरसेवकांवर अन्याय केला जात आहे. अनेक महत्वाचे विषय टाळले जात आहेत. जनतेच्या हितापेक्षा स्व हिताच्या विषयांवर अधिक भाष्य करण्यात येत आहे. किंबहुना असेच ठराव मंजूर करण्यात येत आहेत.

कोविडच्या काळात ऑनलाईन सभा घेतली जात असली तरी त्यामध्ये अनेक नगरसेवकांना बोलू दिले जात नाही. त्यांचे आवाज म्यूट करुन जनतेचे प्रश्न मांडणार्‍या नगरसेवकांची मुस्कटदाबी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. अनेकदा तर आयत्या वेळच्या विषयांच्या नावाखाली अनावश्यक विषयांना मंजुरी देण्यात येत असते. त्याचा गोषवाराही नगरसेवकांपर्यंत पोहचलेला नसतो.अर्थसंकल्पाच्या बाबतीत तर गेल्या दोन-तीन वर्षांपासून अनागोंदीच माजलेली आहे. अर्थसंकल्प वेळेत मंजूर केला जात नसल्यामुळे प्रभागाच्या विकासकामांमध्ये बाधा येत आहे. नगरसेवकांना आपल्या प्रभागातील समस्यांचा निपटारा करण्यात येत नाही. जनतेच्या समोर नगरसेवकांना मान खाली घालावी लागत आहे.

- Advertisement -

महासभा नियमानुसार होतच नाही. त्यामुळे चुकीचे ठराव पारीत केले जात आहेत. या ठरावांची अंमलबजाणी प्रशासनाकडून होऊ नये, अशा मागण्या विरोधी पक्षनेते पठाण आणि ज्येष्ठ नगरसेवक जगदाळे यांनी शरद पवार यांच्यासमोर मांडल्या. त्यावर शरद पवार यांनी, सभागृह सर्व सदस्यांना खुले करुन थेट महासभा घेण्याचा निर्णयही लवकरच घेण्यात येणार आहे. प्रत्यक्ष महासभा घेण्यासंदर्भात आपण संबधितांशी चर्चा करणार आहोत; ठाणे पालिकेतील अनागोंदी संदर्भातही आपण संबधितांशी चर्चा करु, असे आश्वासन दिले. दरम्यान, प्रत्यक्ष महासभा घेण्यासाठी आपण पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांचीही भेट घेणार आहोत, असे शानू पठाण यांनी सांगितले.

 

- Advertisement -

 

 

 

 

 

 

 

 

 

- Advertisement -