ठाण्यात सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांचे अर्धनग्न उपोषण

शासन निर्णय असताना देखील वेतन श्रेणीचा लाभ मिळत नसल्याच्या निषेधार्थ सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कृती समितीच्यावतीने शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एक दिवसीय अर्धनग्न उपोषण करण्यात आले.
महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम १९८१ माधिक १५ नियमानुसार १३ संवर्गातील कर्मचाऱ्यांचे पद्नामांतर करून समकक्ष साठप्त्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर १/१०/१९८९ रोजी समविष्ट करावे तसेच नियम ४० नुसार वेटरन निश्चिती करावी, १/१०/८९ ची कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळावा, १/२/२००६ रोजी आश्वासित प्रगत योजनेचा दुसरा वेतन श्रेनीचा लाभ द्यावा, त्याचे वित्त विभाग शुद्धिपत्रक पत्रकानुसार वेतन ११० / २०१० सेवा ३ नुसार १/१०/२००६ ते ३१ /३/२०१० या कालवधीत देण्यात आलेल्या काल्पनिक वेतन श्रेणीचा फरक रोखीने देण्यात यावा या मागण्यांसाठी सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कृती समितीच्यावतीने हे उपोषण केल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.