घरठाणे'हर हर महादेव'वरून राष्ट्रवादी-मनसे आमनेसामने; राज ठाकरेंचा उल्लेख करत दिग्दर्शकही संतापले

‘हर हर महादेव’वरून राष्ट्रवादी-मनसे आमनेसामने; राज ठाकरेंचा उल्लेख करत दिग्दर्शकही संतापले

Subscribe

काल रात्री राष्ट्रवादीने हरहर महादेवचा शो बंद पाडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक पदाधिकारी आक्रमक झाले असून त्यांनी राष्ट्रवादीविरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे.

ठाणे –हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाचा शो ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस तथा आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांसह ठाण्यातील विवियाना मॉल मधील चित्रगृहात रात्री १० वाजण्याच्या सुमारास प्रवेश करत बंद पाडला. याप्रसंगी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने प्रेक्षकांना सिनेमागृहात बाहेर जाण्याचे आवाहन केले. आता या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाडांच्या १०० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो ठाण्यात राष्ट्रवादीने पाडला बंद

- Advertisement -

अफझलखाचे स्वयंघोषित प्रवक्ते आणि मुंब्रा प्रांताचे नवाब यांचे इतिहासाचे ज्ञान, आणि हे महाराजांचा इतिहास खरा काय आणि खोटा काय ते सांगत आहेत, असं ट्विट मनसे नेते अमेय खोपकर यांनी केलं आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे. काल रात्री राष्ट्रवादीने हरहर महादेवचा शो बंद पाडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक पदाधिकारी आक्रमक झाले असून त्यांनी राष्ट्रवादीविरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे.


अफझल खान हा जर आपल्या सीमेचं रक्षण करण्यासाठी आला होता तर त्याने तुळजापूर येथील मंदिरावर हल्ला का केला असा सवालही अमेय खोपकर यांनी उपस्थित केला आहे. तसंच, सुरू असलेला हर हर महादेवचा शो राष्ट्रवादीने बंद पाडल्याने प्रेक्षकांनी पैसे परत मागितल्याने त्यांना मारहाण झाल्याचा आरोपही मनसेने केला आहे.

- Advertisement -

हर हर महादेव आणि वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटातून चुकीचा इतिहास पसरवला जात असल्याचा आरोप माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला होता. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सिनेनिर्मात्यांना इशारा दिला होता. त्यानंतर अनेक संघटना आक्रमक झाल्या. पुण्यातही संभाजी ब्रिगेडने हर हर महादेवचा शो बंद पाडला. तर, ठाण्यात रात्री हर हर महादेवचा शो राष्ट्रवादीने बंद पाडला. या सर्व प्रकरणात हर हर महादेव चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी या हल्ल्याविरोधात निषेध केला आहे.

ठाणे येथील हर हर महादेवच्या शो मध्ये घुसून सामान्य मराठी प्रेक्षकावर भ्याड हल्ला केल्याबद्दल हर हर महादेवची पूर्ण टीम ह्या विकृत गुंडांचा निषेध करते. माझ्या छत्रपतींवर राजकारण खेळणं बंद करा आणि त्यांचे दैवी विचार आचरणात आणा. खरी शिवभक्ती काय असते हे राजसाहेब ठाकरेंकडून शिका, असं ट्विट अभिजीत देशपांडे यांनी केलं आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -