Friday, April 9, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे ठामपा अधिकारी, कर्मचार्‍यांच्या सुट्ट्या रद्द

ठामपा अधिकारी, कर्मचार्‍यांच्या सुट्ट्या रद्द

Related Story

- Advertisement -

ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर प्रतिबंध आणण्यासाठी पालिका प्रशासनाने पालिका सेवेतील सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यातच सुट्टीच्या दिवशी जे अधिकारी, कर्मचारी गैरहजर राहतील, त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. या संदर्भात महापालिका प्रशासनाने एक परिपत्रक काढून माहिती देण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मागील महिना दीड महिन्यापासून पुन्हा कोरोना या आजाराने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यात दिवसागणिक बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

बाधित रुग्णांची महापालिका क्षेत्रातील आकडेवारी थेट दीड हजारांच्या घरात गेली आहे. या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यानुसार कोरोना विषाणू साथरोग प्रतिबंध अधिनियम १८९७ च्या खंड २, ३ व ४ नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी अधिसूचना १४ मार्च २०२० नुसार अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यात ठाणे महापालिका क्षेत्रात बाधित रुग्णांच्या संख्येत व क्वारंटाइन केलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर पालिकेकडे उपलब्ध असलेल्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांची कोविडच्या कामासाठी नियुक्ती करण्यात येत आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीचा विचार करता, पालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांना पुढील आदेश होईपर्यंत सुट्टीच्या दिवशी सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जे अधिकारी गैरहजर राहतील, त्यांच्याविरोधात साथरोग प्रतिबंधक अधिनियमांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे.

- Advertisement -