घरठाणेमृत्युदर रोखण्यासाठी होम क्वॉरन्टाइन, व्याधीग्रस्तांवर लक्ष

मृत्युदर रोखण्यासाठी होम क्वॉरन्टाइन, व्याधीग्रस्तांवर लक्ष

Subscribe

 प्रस्ताव महासभेच्या पटलावर

कोरोना या महामारीत व्याधीग्रस्त आणि घरीच उपचार घेऊन बरे होऊ पाहणाऱ्यांच्या मृत्युचे प्रमाण मागील वर्षभरात वाढले आहे. तब्बल ६०० रुग्ण उशिराने रुग्णालयात दाखल झाल्याने त्यांचा मृत्यु झाल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यातच आता भविष्यात असे मृत्यु रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने निर्णय पाऊल उचलले असून त्याचाच एक भाग म्हणून या साथरोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने होम आयसोलेशन व्याधीग्रस्त व पोस्ट कोव्हिड व हायरिस्क रुग्ण यांच्या तब्येतीची दैनंदिन चौकशी करुन, त्याबाबत आता दैनंदिन नोंदी ठेवल्या जाणार आहेत. त्यासाठी चार विशेष डॉक्टरांच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली जाणार आहे. तसेच त्यांच्या जोडीला एका कॉलसेंटरच्या माध्यमातून अशा रुग्णांची दैनंदिन विचारपुस केली जाणार आहे. त्यासंदर्भातील महापालिका प्रशासनाने तयार केलेला प्रस्ताव येत्या १९ मे रोजीच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत लक्षणे असलेल्या रुग्णांनी घरीच आजार काढल्याने आणि आता दुसऱ्या लाटेतही अनेक रुग्ण हे घरीच उपचार घेण्याला प्राधान्य देत असल्याने ६०० जणांचा मृत्यु झाल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. त्यामुळे लक्षणे असलेल्या जेष्ठ नागरीक, व्याधीग्रस्त रुग्ण यांनी तत्काळ रुग्णालयात दाखल व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. परंतु आता यापुढे जाऊन जे घरी उपचारासाठी असतील अशा रुग्णांची रोजच्या रोज विचारपुस केली जाणार आहे. तसेच या कामी तज्ञ डॉक्टरांची टीमही तयार करण्यात आली आहे. ठाण्याचा मृत्युदर हा इतर शहरांच्या तुलनेत कमी आहे. त्यातही रुग्णांची चार पट वाढ असतांना मृत्युदर हा स्थीर असल्याचे दिसून आले आहे. असे असले तरी व्याधीग्रस्त आणि उशिराने कोरोना बाधीत रुग्ण रुग्णालयात दाखल होत असल्याने मृत्यु वाढल्याचे दिसून आले आहे. परंतु हा मृत्युदर रोखण्यासाठी महापालिकेने या तज्ञ डॉक्टरांची टीम तयार केली आहे.

- Advertisement -

डॉक्टरांच्या माध्यमातून त्यांच्या जोडीला असलेल्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने अशा प्रकारच्या रुग्णांची रोजच्या रोज विचारपुस केली जाणार आहे, त्यांना कोणत्या स्वरुपाचा त्रास आहे, ताप, ऑक्सीजन लेव्हल, वास घेण्याची क्षमता कशी आहे, तसेच त्यांना योग्य तो औषधोपचार दिला जाणार आहे. जेणे करुन कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे होणारा मृत्युदर बऱ्याच प्रमाणात कमी करणे शक्य होईल असा दावा पालिकेने केला आहे. तसेच व्याधीग्रस्त नागरिकांची नियमितपणे माहिती घेतल्यास त्यांना कोविड होण्याचा व त्यांच्यामुळे इतर लोकांना कोविडचा प्रादुर्भाव होण्याचा धोका टाळणे शक्य होणार आहे. या व्याधीग्रस्त नागरिकांना आवश्यकतेनुसार संबंधित डॉक्टरांसोबत जोडून देण्यात येऊन त्यांचे मानसिक संतुलन योग्य ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

तसेच पोस्ट कोव्हिड रु ग्णांमध्ये अंतीगंभीर लक्षणे आढळून येत असल्याने त्यांना दैनंदिन फोन करु न त्यांच्या तब्येतीची नोंद घेण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. होम आयसोलेशन, व्याधीग्रस्त व पोस्ट कोव्हिड व हायरिस्क रु ग्ण यांच्या तब्येतीची चौकशी करु न नोंद ठेवण्यासाठी एक सुसज्ज कॉल सेंटर तयार करण्यासाठी खाजगी संस्थेची मदत घेतली जाणार आहे. या कॉल सेंटरमधील प्रतिनिधी ज्या कोरोना रु ग्णांची तब्येत खालावली आहे अशा रु ग्णांशी महानगरपालिकेच्या डॉक्टरांसोबत तातडीने बोलणे करुन समन्वय साधला जाणार आहेत. तर या कामी डॉ. स्वाती शिंदे, मनिषा म्हस्के, नेहा कोल्हे आणि तानाजी पाटील यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या वैद्यकीय अधिकाऱ्यांची करारपध्दतीवर मासिक वेतन रक्कम ६० हजार याप्रमाणे ३ महिन्यांच्या कालावधीकरीता नियुक्ती करण्यात येणार असून त्यासाठी सात लाख २० हजारांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -