घरठाणेहर घर दस्तक उपक्रमातून २१ हजार ६०० ठाणेकर झाले लसवंत

हर घर दस्तक उपक्रमातून २१ हजार ६०० ठाणेकर झाले लसवंत

Subscribe

पोलिओ मोहीमेतून ५ लाख ७० घरांना भेट

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात एकही जण कोरोना डोस पासून वंचित राहू नये. म्हणून ठामपाच्या आरोग्य विभागाने हर घर दस्तक या उपक्रमाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन २१ हजार ५९४ ठाणेकरांना कोरोना लसवंत केले आहे. याला पोलिओ मोहिमेची चांगली साथ लाभल्याचे दिसत आहे. तसेच पोलिओ लसीकरणातून ५ लाख ७० हजार घराघरात जाऊन कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला आहे. तर १ लाख ५५ हजार घरांचे सर्वेक्षण अद्यापही बाकी आहे. विशेष महापालिका कार्यक्षेत्रात ९८ टक्के लसीकरण झाले असेल तरी या उपक्रमातून ७ टक्के ठाणेकरांनी पहिला लसीचा डोस शहराबाहेर जाऊन घेतल्याची बाब या उपक्रमातून प्रखरतेने पुढे आली आहे.

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात २७ फेब्रुवारी ते ७ मार्च याचदरम्यान पोलिओ सोबतच कोरोना लसीकरण मोहिम राबवण्यात आली. यासाठी शहरात एकूण १ हजार ६५० पोलिओ बुथ तयार करून त्या पथकांद्वारे त्या कालावधीत घरोघरी भेट देत, ५ वर्षांच्या आतील बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला. याचवेळी कोरोना लस न घेतलेल्या नागरिकांची शोध मोहीम हाती घेत, त्यांना ताबडतोब लसवंत करण्याची किमयाही आरोग्य विभागाने साधली. त्यानुसार ठामपा आरोग्य विभागाने ‘हर घर दस्तक’ हा उपक्रमात ५ लाख ७० हजार ४३ घरांना भेटी दिल्या. यावेळी शहरात एकूण ११ लाख ९६ हजार ५२४ ठाणेकर लसवंत असल्याचे स्पष्ट झाले. त्याचबरोबर या मोहिमेत २१ हजार ५९४ नागरिकांना लसवंत करण्यात हे पथक यशस्वी ठरले आहेत, अशी माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली.

- Advertisement -

७ टक्के ठाणेकरांनी बाहेर जाऊन झाले लसवंत
ठामपा कार्यक्षेत्रात आतापर्यंत ९८ टक्के लसीकरण झाले असून कोरोनाचा पहिला डोस घेतल्यांची टक्केवारी ९१ टक्के तर, दुसरा डोस घेणाऱ्यांची टक्केवारी ७६ टक्के इतकी आहे. तर ११ लाख ७५ हजार ९०९ ठाणेकरांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला असून त्यामध्ये १० लाख ६८ हजार ८६१ नागरिकांनी ठामपात तर, १ लाख ७ हजार ४८ नागरिकांनी बाहेर जाऊन पहिला डोस घेतला आहे. ते प्रमाण ७ टक्के आहे.अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -