घरठाणे...नाहीतर उपासमारीची वेळ येईल

…नाहीतर उपासमारीची वेळ येईल

Subscribe

हॉटेल कामगारांचे लॉकडाऊन विरोधात आंदोलन

राज्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे कोरोना वर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने मिनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. ठाणे महानगर पालिकेकडून ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा सोडून इतर व्यवसाय व दुकाने बंद करण्याचे आदेश पालिकेकडून देण्यात आले आहेत. या आदेशावरून हॉटेल व्यवसायिक आणि हॉटेल कामगारांमध्ये नाराजी पसरलेली आहे.सरकारने केलेल्या या लॉकडाऊन चा निषेध करण्यासाठी हॉटेल कामगारांनी आज ठाण्यात आंदोलन केले. गेल्या वर्षी लॉकडाऊन मुळे हॉटेल कामगारावर उपासमारीची वेळ आली होती. पण त्यातून कसा तरी मार्ग काढत हॉटेल कामगार हे आपला उदरनिर्वाह करत होते. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यावर हॉटेल सुरू होत असताना आता राज्यात परत लॉकडाऊन झाल्यामुळे हॉटेल कामगांरावर वाईट परिस्थिती आलेली आहे.

सरकारने नियमात बदल करून हॉटेल व्यवसायिकांना सूट देण्यात यावी सरकारने कोरोना संबंधित जे नियम घालण्यात आलेले आहेत त्या नियमांचे काटेकोर पालन केले जाईल. असे हॉटेल व्यावसायीकांकडून सांगण्यात येत आहे. लॉक़डाऊनमुळे होटेल व्यावसायींकावर मोठे संकट आले आहे. सरकारने हॉटेल व्यावसायीकांना यातून सुट देण्यात यावी. सरकारचे सर्व प्रकारचे कर आम्ही भरत आहोत. माझी सरकारला हात जोडून विनंती आहे, त्यांनी यावर तो़डगा काढून हॉटेल कामगार व व्यावसायीकांना न्याय द्यावा. प्रत्येक संकटात आम्ही सरकार सोबत आहोत. सरकारच्या मदतीची आम्हाला आता खरी गरज आहे. असे ठाणे हॉटेल असोसिएशनचे उपाध्यक्ष चंद्रकांत शेट्टी म्हणाले.

- Advertisement -

 

या संकटातून बाहेर पडण्यासाठी हॉटेल व्यावसायीकांनी मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आहे. आता सुरळीत चाललेला व्यवसात लॉकडऊन मुळे परत डबघाईला येईल. कामगारांचा पगार, हॉटेल चे भाडे, आणी इतर खर्च करण्यासाठी आम्ही काय करणार असा थेट सवाल ठाणे हॉटेल असोसिएशनचे सदस्य प्रितम सिंग यानी सरकारला विचारला आहे. आता सरकार यावर कोणती भूमिका घेईल हे पहाव लागेल.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -