घरठाणेठाण्यातील हॉटेल्स रात्री ११.३० पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी

ठाण्यातील हॉटेल्स रात्री ११.३० पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी

Subscribe

मिशन बिगेन अगेनच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील हॉटेल्सबाबत ठाणे महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ठाण्यात हॉटेल्स, रेस्तराँ, फूड कोर्ट आणि बार रात्री ११.३० पर्यंत सुरु ठेवण्यात संमती देण्यात आली आहे. उद्या, १० ऑक्टोबरपासून सकाळी ७ ते रात्री ११.३० या वेळेत ती खुली ठेवण्यास संमती दिली आहे. याबाबत ठाणे महापालिकेने पत्रक जारी केले आहे. हॉटस्पॉट क्षेत्राव्यतिरिक्त संपूर्ण शहरात राज्य ३० सप्टेंबर २०२० रोजी उपरोक्त संदर्भ ४ च्या आदेशान्वये जाहीर केल्याप्रमाणे मिशन बिगिन अगेन सुरु राहिल. तर हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्तराँ आणि बार सकाळी ७ ते रात्री ११.३० या वेळेत संमती देण्यात आली आहे. मात्र हॉटस्पॉट क्षेत्रांमध्ये ३१ ऑक्टोबरच्या रात्री १२ पर्यंत लॉकडाउन सुरु राहणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

दरम्यान, ठाणे महापालिकेने मॉल तसेच व्यापारी संकुलांमधल्या सिनेमागृहांसह स्विमिंग पूल, एन्टरटेन्मेंट पार्क, ऑडिटोरियम, अशा प्रकारचे अन्य हॉल वगळता सर्व भाजी मार्केट आणि दुकाने तसेच हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्तराँ, बार यांच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेच्या मर्यादेत सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत खुली ठेवण्यास संमती दिली होती. मात्र आता ही वेळ वाढवण्यात आली आहे. सकाळी ७ ते रात्री ११.३० या काळात ही संमती देण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

TRP RACKET :रिपब्लिकच्या CFO सह दोन जाहिरात कंपन्यांना समन्स

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -