घरठाणेहातोड्याने पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

हातोड्याने पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Subscribe

श्रीनगर पोलिसांनी पतीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला

आईवडिलांपासून वेगळे राहण्यासाठी तगादा लावणाऱ्या पत्नीच्या डोक्यात हातोड्याने प्रहार करून तिची हत्या केली, त्यानंतर स्वतःही गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी ठाण्यातील वागळे इस्टेट इंदिरा नगर परीसरात उघडकीस आली. या प्रकरणी श्रीनगर पोलिसांनी पतीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आश्विनी समुखराव (१८) आणि आकाश समुखराव (२२) असे या नवदाम्पत्याचे नावे आहेत.

ठाण्यातील वागळे इस्टेट येथील इंदिरा नगर,शिवमहिमा चाळ येथे राहणाऱ्या दाम्पत्याचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. आकाश हा एका कीटकनाशक कंपनीत नोकरीला होता तर अश्विनी गृहिणी होती. लग्नानंतर आकाश हा आईवडिलांसोबत राहत होता, मागील काही महिन्यापासून पत्नी अश्विनी हिने पती आकाशाकडे आईवडिलांपासून वेगळे राहण्यासाठी तगादा लावला होता, मात्र मी आई वडिलांना सोडून राहणार नसल्याचे त्याने पत्नी अश्विनी हिला अनेक वेळा समजावले होते. यावरून दोघात नेहमी भांडणे होत होती.

- Advertisement -

मंगळवारी रात्री अश्विनी हिने पुन्हा वेगळे राहण्याचा विषय छेडताच दोघात पुन्हा भांडणे झाली. सकाळी आकाशचे आईवडील घराबाहेर गेले असता कामावर निघालेला पती आकाशला पुन्हा वेगळे राहण्यासाठी विचारले असता संतापलेल्या आकाशने पत्नीला मारहाण करून तिच्या डोक्यात हातोड्याने प्रहार केला. वर्मी घाव बसताच अश्विनी जागेवरच कोसळली आणि तिच्या डोक्यातून मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव सुरु होऊन त्यात तिचा मृत्यू झाला. पत्नीला या अवस्थेत बघून घाबरलेल्या आकाशने राहत्या घरातच साडीने गळफास लावून आत्महत्या केली.

सकाळी १० वाजता आकाशचे आईवडिल घरी आले असता त्यांनी घरातील दृश्य बघून हंबरडा फोडला, आजूबाजूवाल्यानी ताबडतोब समुखराव यांच्या घराकडे धाव घेऊन पोलिसांना कळवण्यात आले. श्रीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालय येथे पाठवून आकाशच्या वडिलांचा जबाब घेण्यात आला असून त्यांनी दिलेल्या जबाबात वेगळे राहण्यावरून दोघात नेहमी भांडणे होत होती, त्यातून हा प्रकार घडला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी दिली. याप्रकरणी मृत आकाश याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -