घरठाणेपत्नीकडून मुलीच्या मदतीने पोलीस हवालदार पतीची हत्या

पत्नीकडून मुलीच्या मदतीने पोलीस हवालदार पतीची हत्या

Subscribe

घरगुती वादातून झालेला प्रकार

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या नाना पावशे चौकातील एका इमारतीत रहाणाऱ्या पोलीस हवालदार कुटूंबाचा घरगुती वाद इतका विकोपाला गेला की या वादातून पत्नीने पोलिसात नोकरीवर असलेल्या पतीच्या डोक्यावर जबर  मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. या मारहाणीत मृत इसमाची मुलगीही सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पत्नी आणि मुलगी या दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाना पावशे चौकातील हिरा पन्ना अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्या वरील रूम नं १५ मध्ये रहाणाऱ्या बोरसे कुटूंबामध्ये ६ जानेवारीच्या रात्री ९ चे सुमारास  कौटुंबीक वाद झाला.  या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. विकोपाला गेलेल्या या हाणामारीत मृत प्रकाश राजाराम बोरसे (५५) यांची पत्नी ज्योती प्रकाश बोरसे (४५) आणि मुलगी भाग्यश्री प्रकाश बोरसे (२७) या दोघींनी प्रकाश बोरसे यांच्या कपाळावर, तोंडावर कोणत्यातरी जड वस्तूने मारहाण केली. या मारहाणीत जबरी जखमी झालेले प्रकाश बोरसे यांना औषधोपचारासाठी  रुग्णालयात नेले असता औषधोपचार सुरु होण्यापूर्वीच प्रकाश बोरसे याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

- Advertisement -

या मारहाणीत प्रकाश बोरसे यांचा खून केल्याप्रकरणी पत्नी ज्योती आणि मुलगी भाग्यश्री यांच्या विरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला.  वरिष्ठ पोलिस निरिक्षक बशीर शेख यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरिक्षक सी. एम.कदम अधिक तपास करीत आहेत. मृत प्रकाश बोरसे हे कुर्ला येथील पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार या पदावर कार्यरत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -