घरठाणेकर भरला नाही तर मालमत्ता जप्त

कर भरला नाही तर मालमत्ता जप्त

Subscribe

केवळ 21 दिवसांची डेडलाईन

पालिकेच्या मालमत्ता कर विभागाने वसुलीसाठी आक्रमक पवित्रा घेतला असून कर चुकवणा-या तब्बल 65 हजार जणांना पालिकेने वॉरंट दिले आहेत. त्यात 20 हजार रुपयांच्या वरील मंडळींचा समावेश आहे. वॉरंट मिळाल्याच्या 21 दिवसात कर भरला नाही तर आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्या निर्देशानुसार संपत्ती जप्त करणार, असा इशारा मालमत्ता कर विभागाच्या उपआयुक्त प्रियंका राजपूत यांनी दिला आहे.

यावर्षी मार्च अखेरपर्यंत विक्रमी वसुलीच्या उद्देशाने पालिकेने कंबर कसली आहे. पुन्हा अभय योजना लागू होणार अशी अफवा पसरवण्यात येत आहे. मात्र तशी कोणतीही योजना लागणार नसून कर भरून जप्तीच्या प्रक्रियेतून स्वतःची सुटका करून घेणे. हा एकमेव पर्याय असल्याचे प्रियंका राजपूत यांनी स्पष्ट केले.
कर विभागाची उल्हासनगरकरांवर 600 कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यात चालू वर्षाची 120 कोटींची मागणी असून 180 कोटी जुनी थकबाकी आहे. त्यामध्ये 300 कोटी रुपयांचा दंड आहे. तर जवळपास 50 हजार करबुडव्यांवर 150 ते 200 कोटींची थकबाकी आहे.

- Advertisement -

वॉरंट बजावून 21 दिवस पूर्ण होऊन प्रतिसाद देत नसणाऱ्यांच्या संपत्ती जप्त करण्यासाठी स्वतः प्रियंका राजपूत, मुख्य कर निर्धारक व संकलक जेठाचंद ताराचंदानी, उपकर निर्धारक आणि संकलक मनोज गोकलानी, उद्धव लुल्ला ऑन द फिल्ड उतरले आहेत. या टीमने 16 लाखाची थकबाकी असलेला बाबा प्राइम हा लग्नाचा हॉल, 11 लाखांची थकबाकी असलेला डॉल्फिन हॉटेलवरील इंड्स कंपनीच्या टॉवर सील केला होता. त्यांनी थकबाकी भारताच त्यांना ठोकलेले सील उघडण्यात आले आहे.

पालिकेची गुरुवारपर्यंत 47 कोटींची वसुली

- Advertisement -

उपआयुक्त प्रियंका राजपूत यांनी मार्च एन्ड पर्यंत 100 कोटी रुपये वसुलीचे लक्ष केंद्रित केले आहे. गुरुवारपर्यंत 12 जानेवारी पर्यंत 47 कोटी रुपयांची वसुली झाली आहे. अद्याप अडीच महिने असून ज्या पद्धतीने 65 हजार कर चुकवणा-यांना वॉरंट बजावण्यात आले, आणि जप्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने प्रियंका राजपूत आणि त्यांची टीम 100 वसुलीचे लक्ष पार करणार असे चित्र निर्माण झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -