घरठाणेत्रिसूत्री नियम पाळले नाहीतर ठाण्याची परिस्थिती नागपूरसारखी होईल

त्रिसूत्री नियम पाळले नाहीतर ठाण्याची परिस्थिती नागपूरसारखी होईल

Subscribe

आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी वर्तवला धोका

मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टेसींगचे नियम पाळा हे त्रिसूत्री नियमांचे पालन करा. त्यातच नियमांचे पालन करणे जर शक्य होणार नसेल तर केवळ निर्बंध घालून काही उपयोग नाही, त्यापेक्षा नागपूर प्रमाणेच पूर्ण लॉकडाऊन करावा लागेल, असा सूचक वजा इशाराच ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी बोलताना दिला आहे. मात्र घाबरण्याची परिस्थिती ठाण्यात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

ठाण्यात मागील काही दिवसापासून कोरोना प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्यातच बुधवारी ठाण्यात ५६३ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ही रुग्ण संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग आणि सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांची बैठक बुधवारी महापालिका मुख्यलयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयुक्तांनी घेतली होती. यावेळी या दोघांमध्ये समन्वय साधून त्यांनी कोरोनाची परिस्थिती योग्य प्रकारे हाताळण्याच्या सुचना आयुक्तांनी दिल्या आहेत. रुग्ण संख्या वाढत असली तरी ठाण्यात कोविड सेंटर पुरेसे आहेत, अॅमब्ल्युलेन्सची सुविधा रुग्णाला अर्धा तासात उपलब्ध करुन देण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. पुरेसा औषधसाठा आहे, शहरात विविध रुग्णालयात पुरेसे बेड उपलब्ध असून आणखी ५०० बेड वाढविण्यात आल्याचेही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. व्हेंटिलेटर देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून घरोघरी जाऊन ताप सर्व्हे पुन्हा सुरु करण्यात आहे असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

सध्या रुग्ण वाढत असले तरी त्यातील लक्षणो नसलेल्या रुग्णांचे प्रमाण हे जास्तीचे असून आजच्या घडीला ९० टक्के रुग्ण हे घरीच उपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. सहाय्यक आयुक्तांना देखील महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून कोणत्या भागात रुग्ण जास्त प्रमाणात वाढत आहेत, त्या मागची कारणे कोणती आहेत. याचा आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे. तसेच कोरोना दक्षता समिती स्थापन करण्यात येऊन त्या माध्यमातून कोरोनाचा आढावा घेतला जाणार आहे. कोवीड सेंटरसह विलगीकरण केंद्रही सज्ज करण्यात आले असून त्याठिकाणी लक्षणो नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. कोरोनासाठीचा कंट्रोल रुमही सज्ज असून नागरीकांनी या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहनही आयुक्तांनी यावेळी केले.

टीएमटी बसमध्ये ५० टक्के क्षमतेला परवानगी
ठामपा परिवहन मार्फत सुरु असलेल्या बसेसमधून ५० टक्के क्षमतेनेच प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. एक आसन सोडून बसण्याची परवानगी असणार आहे. याचे पालन प्रवाशांनी करावे असे आवाहन केले आहे. तसेच शेअर रिक्षांमधूनही जास्तीच्या प्रवाशांना परवानगी असणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

नियमांचे पालन करण्याची नागरिकांची जबाबदारी
ठाणे महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. परंतु नियम पाळण्याची जबाबदारी ही नागरीकांची देखील आहे. त्यामुळे नागरीकांनी या नियमांचे पालन केले तर नक्कीच कोरोनाला रोखण्यात यश येईल असे मतही यावेळी महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -