घरठाणेअंबरनाथ शहरात बेकायदा कॉल सेंटर

अंबरनाथ शहरात बेकायदा कॉल सेंटर

Subscribe

पाच जण अटकेत

एका बेकायदेशीर कॉल सेंटरवर धाड टाकून पोलिसांनी कॉल सेंटर चालविणाऱ्या 5 जणांना अटक केली आहे. हे आरोपी विदेशी नागरिकांना वेगवेगळ्या स्किमचे आमिष दाखवून त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढून घेत होते. अंबरनाथ ( प ) येथील कल्याण -कर्जत महामार्गजवळ ग्लोब बिझनेस पार्क या ठिकाणी एक बनावट कॉल सेंटर असून तेथून विदेशी नागरिकांच्या बँक खात्यातून पैसे काढून घेत असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखा युनिट चार ला मिळाली होती, ही बाब त्यांनी स्थानिक अंबरनाथ पोलिसांना दिली, त्यानुसार दोन्ही पोलीस पथकांनी गुरुवारी रात्रीच्या सुमारास धाड टाकून आरोपी ऍलेक्स डेव्हीड दासरी मिल्टन मेल्वीन मंतेरो , श्रीकांत जयप्रकाश पवार, आकाश विनोद ठाकुर पंकज रतनसिंह गौड यांना ताब्यात घेतले.

आरोपींनी “एक्सफिनिटी” या कंपनीमधुन बोलत असल्याचे सांगून कंपनीच्या नावाचे गुगलवर वेगवेळया ईमेल आयडी वरून जाहीरात टाकुन विदेशी नागरिकांना आपली नावे खोटी सांगत असत , त्यांना फसविण्यासाठी आरोपी त्यांना वेगवेगळी इंटरनेट सेवा ऑफर, बक्षिस देणार असल्याचे सांगत असत त्याचप्रमाणे त्यांचे डेबीट किंवा क्रेडीट कार्डचा १६ डिजीटचा नंबर सी. व्ही. व्ही नंबर, एक्सपायरी डेट व्हीजा कार्ड नंबर, झीप कोड नंबर, बॅकेच नाव, मेल आय डी अशी संपुर्ण वैयक्तीक माहिती घेवुन विदेशी नागरीकांच्या अकाउंट मधुन पैसे काढुन घेत होते. पोलिसांनी यासंदर्भात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे . या गुन्ह्याचा अधिक तपास गुन्हे शाखाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र अहिरे करीत आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -