घरठाणेधूळ प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ अंमलात आणा

धूळ प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ अंमलात आणा

Subscribe

आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांचे निर्देश

उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महापालिका क्षेत्रात धुळ प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी येत्या 2 दिवसांत पाहणी करुन नियमांचे, मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत संबंधित अधिकार्‍यांना दिले.
त्याअनुषंगाने धूळ प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात आणण्याच्या कामात दोन ब प्रभागात सहा.आयुक्त राजेश सावंत यांनी 10 बांधकाम विकासकांना, 4 जे प्रभागाच्या सहा.आयुक्त सविता हिले यांनी 4 बांधकाम विकासकांना, तर 6/फ प्रभागातही सहा.आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी 5 बांधकाम विकासकांना, 10 ई प्रभागात सहा.आयुक्त भारत पवार यांनी देखील 4 बांधकाम विकासकांना, त्याचप्रमाणे 9 आय प्रभागाच्या हेमा मुंबरकर यांनी 2 बांधकाम विकासकांना नियमांचे पालन करणेबाबत नोटीसा बजाविल्या. 3 क प्रभागात धूळ प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या नसल्याने सहा.आयुक्त तुषार सोनवणे यांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी कल्याण पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील साईं कृष्णा साइटचे बांधकाम बंद केले.

डोंबिवली पूर्व येथील टंडन रोडवरील साखरी गणेश सोसायटी इमारतीचे पुनर्विकासासाठी तोडकाम करताना संबंधितांनी धूळ प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन न केल्याने हे पाडकाम थांबविण्याची कारवाई 8/ग प्रभागाच्या सहा.आयुक्त सोनम देशमुख यांच्या पथकाने केली. तसेच आदेशाचे पालन करणेबाबत नोटीस बजाविण्यात आली. महापालिका क्षेत्रात बांधकाम साहित्याची वाहतुक करणार्‍या वाहनांवर (वायु प्रदुषण नियंत्रण सूचनांचे पालन करत नसल्यास) कठोर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांनी दिले असून, त्यानुसार प्रादेशिक परिवहन विभागास कळविण्यात आल्याची माहिती पर्यावरण व प्रदुषण नियंत्रण विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -