Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर ठाणे राज ठाकरेंच्या संकल्पनेची डोंबिवलीत अंमलबजावणी

राज ठाकरेंच्या संकल्पनेची डोंबिवलीत अंमलबजावणी

Subscribe

नाका तिथे शाखा सुरू

 जनतेशी संवाद साधण्यासाठी ‘नाका तिथे शाखा’ संकल्पना अंमलात आणा असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवली दौऱ्यादरम्यान आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला होता .राज ठाकरेंच्या संकल्पनेची डोंबिवलीत अंमलबजावणी करण्यात आली आहे .डोंबिवली पश्चिमेतील कान्होजी जेधे ( भागशाळा ) मैदान येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांशी गप्पा मारत समस्या जाणून घेतल्या.

अनेकदा शाखेत येवून नागरिक खुलेआमपणे काही विषयावर बोलण्यास कचरतात .त्यामुळे लोकांच्या समस्या आपल्या पर्यंत पोहचत नाही .ज्या ठिकाणी मनसेच्या शाखा नाहीत ,त्याठिकाणी नाका तेथे शाखा हि संकल्पना राबवा .खुल्या वातावरणात जनतेशी संवाद साधा .त्यांच्याशी गप्पा मारा ,आपोआप शहरातील आणि जनतेच्या समस्या आपल्या पर्यंत पोहचतील ,असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानुसार बुधवारी सायंकाळी डोंबिवली पश्चिमेत कान्होजी जेधे ( भागशाळा ) मैदान येथे मनसे शहरअध्यक्ष मनोज घरत, डोंबिवली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे, संदीप ( रमा ) म्हात्रे, हिम्मत म्हात्रे, प्रतिभा पाटील,  सुमेधा थत्ते या पदाधिकाऱ्यांनी  ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग आणि तरुणांशी संवाद साधला.थेट संवाद साधल्याने नागरिकांच्या समस्या जाणून घेता आल्या आणि त्यावर उपायही सुचविल्याने ही संकल्पना यशस्वी होत असल्याचे प्रल्हाद म्हात्रे यांनी सांगितले.शहरातील समस्या ज्या पोहचत नव्हत्या. त्या समस्या समोर येत असल्याने त्याकडे लक्ष दिल्यास त्या सुटू शकतात, असा विश्वास शहराध्यक्ष मनोज घरत यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -