घरठाणेभिवंडीत २२ वर्षांत दीड लाख मुक्या जनावरांना जीवदान

भिवंडीत २२ वर्षांत दीड लाख मुक्या जनावरांना जीवदान

Subscribe

२००१ पासून जनावरांना वाचवण्याचा प्रयत्न

शहरातील समस्त जैन महासंघाशी संलग्न असलेली श्री जैन अलर्ट यंग ग्रुप ही संस्था गेल्या २२ वर्षांपासून बेवारस, मुक्या प्राणी आणि पक्ष्यांना जीवदान देण्याचे काम अविरतपणे करत आहे. या दरम्यान आजपर्यंत शहर व आजूबाजूच्या परिसरातील १ लाख ५० जनावरांची या संस्थेने सुटका करून पशुपक्ष्यांचे जीव वाचवले आहेत. आता दररोज २१ जनावरांचे प्राण वाचवण्याचे उद्दिष्ट संस्थेने ठेवले आहे. भिवंडी महानगरपालिका व परिसरात जखमी पशु-पक्ष्यांसाठी कोणीही प्राणीमित्र समाजसेवी काम  करीत नाही. मात्र श्री जैन अलर्ट यंग ग्रुप ही संस्था अशा मुक्या जनावरांवर मोफत उपचार करीत आहे.
मुके प्राणी, पक्षी आणि इतर प्राण्यांवर उपचार करण्याचे काम पी.पी.आचार्य हेमरत्नसूरीश्‍वरजी गुरुजी यांच्या प्रेरणेने २००१ सालापासून सुरु केले आहे. या कामासाठी रुग्णवाहिकेसह सेवानिवृत्त पशुवैद्यकीय डॉक्टर, सहाय्यक डॉक्टर कार्यरत आहे. दररोज सरासरी २१ नि:शब्द प्राणी, पक्षी व इतर प्राण्यांवर मोफत उपचार केले जातात. रुग्णवाहिका सेवा सकाळी साडे नऊ वाजल्यापासून सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत सुरू असते. संस्थेतर्फे जनावरांवर मोफत उपचार करण्यासाठी मोबाईल क्रमांक जारी करण्यात आला आहे.या क्रमांकावर संपर्क केल्यावर उपचार करणारी टीम घटनास्थळी पोहचून मुक्या जनावरांवर उपचार करतात. अनेकवेळा जखमी कुत्र्यांना पकडून त्यांच्यवर उपचार करून पुन्हा त्यांना त्यांच्या मूळ ठिकाणी आणून सोडतात. ही सेवा फक्त भिवंडी आणि आसपासच्या भागासाठी असल्याचे संस्था सदस्यांनी सांगितले. सन २००१ ते २०२३ या कालावधीत भिवंडीतील १ लाख ५० हजार ८०० मुक्या पक्षी,प्राण्यांवर उपचार करण्याचा बहुमान श्री  जैन अलर्ट यंग ग्रुपला मिळाला आहे.हे काम सदर संस्थेने देणगीदारांच्या मदतीने केले आहे. या टीमने एका हत्तीवरही उपचार केले आहे. प्राण्यांच्या उपचारासाठी अशोक जैन, दिनेश जैन, किशोर जैन, मांगीलाल जैन, विरल शहा, सुमित जैन, सचिन जैन आणि त्यांची टीम सतत कार्यरत आहे.या प्राण्याच्या सेवेसाठी संपूर्ण जैन महासंघ सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतो.
संस्थेने जनावरांवर उपचारासाठी ९८५०५३०००१ हा मदतकार्य क्रमांक जाहीर केला आहे.त्यामुळे अपघातग्रस्त मुक्या प्राण्यांवर तूर्तास उपचारासाठी शहरातील नागरिकांनी या क्रमांकाचा वापर करून प्राण्यांचे जीव वाचवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जैन महासंघाचे संयोजक अशोक जैन यांनी शहरवासीयांना केले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -