घरठाणेदिल्लीत मोदीविरोधक नाही तर सर्व भ्रष्टाचारी एकत्र येत आहेत; केंद्रीय मंत्री कपील...

दिल्लीत मोदीविरोधक नाही तर सर्व भ्रष्टाचारी एकत्र येत आहेत; केंद्रीय मंत्री कपील पाटील यांचे वक्तव्य

Subscribe

दिल्लीत एकत्र येणारे सर्वजण भ्रष्टाचारी आहेत असा विरोधकांवर हल्लाबोल करत केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. 

केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर भिवंडीचे खासदार केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी आज ठाण्यात जनआशीर्वाद यात्रा काढली होती. याची जबाबदारी भाजपाचे आमदार संजय केळकर यांच्यावर सोपवण्यात आली होती. यावेळी कार्यकर्त्यांसह अनेक दिग्गज नेते या जनआशीर्वाद यात्रेला उपस्थित होते. यावेळी विरोधकांना मंत्री कपिल पाटील यांनी चांगलाच टोला लगावला. पुर्वी राजा विरोधात चोर, दरोडेखोर एकत्र यायचे याचा अर्थ राजा चांगले काम करतो असं सिद्ध व्हायचं मात्र आता दिल्लीत सर्व भाजपा विरोधी नेते एकत्र येत आहेत याचा अर्थ नरेंद्र मोंदीचे काम चांगले सुरु असून लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. हे एकत्र येणारे सर्वजण भ्रष्टाचारी आहेत असा विरोधकांवर हल्लाबोल करत केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे.

 

- Advertisement -

याच सोबत मी मंत्री झाल्या नंतर नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे याकरता तात्काळ उड्डाण मंत्र्यांची विमानतळ संघर्ष समिती सोबत भेट घडवून दिली.अशी माहीती जन आशीर्वाद यात्रा सुरू असताना  ठाण्यातील मासुंदा तलावात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांनी पत्रकारांशी बोलताना हा टोला लगावला.  याच वेळी त्यांनी आनंदराव दिघे यांचे दर्शन घेऊन त्यांची ही यात्रा पुढे टेंभी नाका, कळवा, मुंब्रा, शिळफाटा या मार्गाने डोंबिवली कल्याण च्या दिशेने जाणार आहे. या यात्रेत भाजपाच्या दिग्गज नेत्यासह कार्यकत्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. यावेळी भा.ज.प. युवा मोर्चांच्या कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढली होती.

 

- Advertisement -

ठाणे शहराच्या वेशीवर असलेल्या आनंदनगर टोलनाका येथून कपिल पाटील यांच्या जन आशिर्वाद यात्रेला सुरुवात झाली ते वागळे इस्टेट, इंदिरा नगर, मासूंदा तलाव करत पुढे टेंभी नाका येथून पुढे जाऊन ठाणे शहरातील कपिल पाटील यांची जन आशिवार्द यात्रा माजीवडा येथे संपन्न झाली मात्र कळवा, मुंब्रा, शिळफाटा करत डोंबिवली कल्याण अशी ही कपिल पाटील यांची यात्रा पुढे गेली आहे. पाच दिवसांनतर ही जनआशीर्वाद यात्रा भिवंडीत पोहचणार आहे. त्यामुळे भाजपाला सेनेच्या बालेकिल्यात आगामी पालिकेच्या निवडनुकीमध्ये शह देता येईल का हे देखील तितकेच महत्वाचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -