घरठाणेमुंब्र्यात घराच्या भिंतीचा काही भाग पडून महिला जखमी

मुंब्र्यात घराच्या भिंतीचा काही भाग पडून महिला जखमी

Subscribe

मुसळधार पावसामुळे एक मजली घराच्या भिंतीचा काही भाग कोसळल्याची घटना मुंब्र्यात घडली. मुंब्रा, रशिद कंपाउंड येथे तळ अधिक एक मजली घराच्या भिंतीचा भाग गुरूवारी पहाटेच्या सुमारास घडली.

मुसळधार पावसामुळे एक मजली घराच्या भिंतीचा काही भाग कोसळल्याची घटना मुंब्र्यात घडली. मुंब्रा, रशिद कंपाउंड येथे तळ अधिक एक मजली घराच्या भिंतीचा भाग गुरूवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेत तब्बासुम जलील सय्यद ही ५० वर्षीय महिला किरकोळ जखमी झाला आहे. उपचारासाठी तब्बासुम जलील सय्यद याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले आहे. (In Mumbra a part of the wall of the house fell down and injured a woman)

मुंब्रा,रशिद कंपाउंड, येथे रशिद मुल्हा चाळ मधील चाळ क्रमांक-१ मधील खोली क्रमांक-७ या घराच्या भिंतीचा काही भाग पडला. आपत्ती व्यवस्थापन कक्षेला मिळाली. त्यानुसार घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, कार्यकारी अभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग), अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून तब्बासुम सय्यद ही महीला किरकोळ जखमी झाली आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

- Advertisement -

अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील इयत्ता १२वी पर्यंतच्या शाळांना १४ आणि १५ जुलै रोजी अशी दोन दिवसांची सुट्टी ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेश नार्वेकर यांनी जाहीर केली आहे.

मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबई वगळता सर्व ठिकाणी शाळांना सुटी देण्यात आल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. शिवाय, पुणे, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. तर अनेक ठिकाणी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाच्या गुरुवारी होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करणार आहे, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. मुख्यतः इंजिनिअरिंग विद्याशाखेच्या परीक्षा आहेत. त्याचबरोबर इतरही विद्याशाखेच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.


हेही वाचा – राज्याच्या अनेक भागांत पूरस्थिती; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा बंद

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -