घरठाणेठाणे पुन्हा तापू लागले

ठाणे पुन्हा तापू लागले

Subscribe

तापमान 42.9

गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील तापमान हे कमी जास्त होत असल्याने असे उन नको रे बाबा ! असे म्हणण्याची वेळ ठाणेकरांवर ओढवली आहे. रविवारी 41.3 तर सोमवारी हेच तापमानाचा पारा 42.9 अंश इतका वर पारा चढला होता. त्यामुळे अंगातून घामाच्या वाहणार्‍या धारांनी जीव कासावीस झाला होता. याशिवाय 14 दिवसांपैकी 6 दिवसांमध्ये ठाण्याचे तापमान 40 ते 45 .6 अंशांच्या घरात असल्याने बाहेर पडल्यावर गरम वाफांनी जीव कासावीस होत होता.

मार्च महिन्यात ठाण्याचे तापमानाने 40 शी ओलांडली आहे. त्यातच हे तापमान कधी कमी तर मध्येच जास्त होत आहे. होळीच्या दिवशी म्हणजे 17 मार्चला तापमान 45.6 अंशावर गेले होते. यामुळे ठाण्यातील तापमानाची तुलना विदर्भाशी केली जाऊ लागली आहे. 16 ते 28 मार्च दरम्यानचे तापमान 34.8 ते 45.6 अंश इतके नोंदवले गेले आहे. तर या 14 दिवसात 24 मार्च सर्वात कमी म्हणजे 34.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तदपूर्वी म्हणजे 20 मार्चला 35.2 अंश तापमान होते. उर्वरित 12 दिवसात हे 37.1 अंशाच्या पुढे होते.

- Advertisement -

24 ते 26 मार्च या तीन दिवसात तापमान 40 अंशाच्या घरात होते. त्यामुळे ठाणेकर कुठे सुखावले असताना मात्र रविवारी 27 मार्चला पुन्हा सूर्य आग ओतू लागला आहे. हे तापमान 41.3 अंश इतके झाले त्यातच सोमवारीपासून राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली होते. त्यानुसार सोमवारी वाढल्याचे बोलले जात आहे. 31 मार्च पर्यंत पारा चढता राहणार असल्याने हे तापमान आणखी किती वाढते की यापेक्षा कमी होते ते पाहावे लागणार आहे. यामुळे ठाणेकर नागरिकांनी उन्हात बाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.

ठाण्यातील तापमानाचा तक्ता
तारीख           तापमान
16 मार्च 2022    44
17 मार्च 2022    45.6
18 मार्च 2022    43.2
19 मार्च 2022    39.9
20 मार्च 2022    35.2
21 मार्च 2022    39.4
22 मार्च 2022    37.6
23 मार्च 2022    44.1
24मार्च 2022     34.7
25मार्च 2022     37.1
26मार्च 2022     39.7
27मार्च 2022     41.3
28मार्च 2022     42.9

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -